💥परभणी ते साडेगाव रोड वरील मांगणगाव येथील अर्धवट पुलाच्या कामाबाबत प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक....!


💥प्रहार जनशक्ती पक्ष खंडहर झालेल्या जुन्या पुलाचे प्रतिकात्मक पिंडदान व गोड जेवण करून करणार आंदोलन💥


परभणी (दि.११ फेब्रुवारी) - तालुक्यातील परभणी ते साडेगाव रस्त्यावर मांगणगाव जवळील नाल्यावरील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमलेल्या कंत्राटदाराने  फूल अर्धवट बांधून सोडून दिले आहे असून मागील ८-९ वर्षा पासून हा पूल असाच अर्धवट अवस्थेत असून त्यावर आत्ता मोठमोठे झाडे उगवली असून पुलाच्या काँक्रिट ची राख व्हायला सुरुवात झाली आहे या पुलाच्या मागणी साठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवार दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता परभणी - साडेगाव रस्त्यावरील मांगनगाव येथील खंडहर झालेल्या पुलाला पाडून तेथे तत्काळ नविन पुल बांधण्यात यावा मागणीसाठी *भग्न अवस्थेतील मांगनगाव येथील जुन्या पुलाचे प्रतिकात्मक पिंडदान व गोड जेवण करून आंदोलन* प्रहार जनशक्ती पक्ष व परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येणार आहे.


परभणी ते साडगाव या रस्त्याने प्रवास करणाऱ्या मांगणगाव, साडेगाव, वाडीदमई, सावंगी खुर्द, बाबडे टाकळी, जोडपरळी व पिंगळी कोथळा या गावांना हा पुल परभणीशी जाडतो. या गावातील नागरीकांना पुल नसल्याने पावसाळ्यात या रस्त्याने वाहतूक बंद करावी लागते हा रस्ता वाहतुकीसाठी महत्वाचा आहे असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शिवाय पुलाचे अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारास सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचे बील अदा केले आहे ही एक गंभीर बाब आहे.


मागील ८ ते ९ वर्षा पासून अर्धवट बांधकाम करून सोडून दिलेल्या मुलाच्या कामाची सखोल चौकशी करुन या पुलाच्या कामावर देखरेख करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीचे तत्कालीन उप कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी तसेच ज्या कंत्राटदाराने पुलाचे काम पूर्ण न करता बिल उचलले ते बिलाची रक्कम संबंधीत कंत्राटदार व तत्कालीन अधिकारी यांच्या कडून वसूल करून ती रक्कम शासन दरबारी जमा करावी व पुलाचे काम अर्धवट साडून पळून जाणाऱ्या संबंधीत कंत्राटदारास तात्काळ काळया यादीत टाकण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.डी.जी.पोत्रे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या पुलाची उपयुक्तता व परिसरातील नागरीकांना वाहतुकीसाठी होणारी अडचण लक्षात घेता त्वरीत या पुलाला पाडून त्या जागी नविन पुलाचे बांधकाम तत्काळ करण्यात यावे तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कायवाही करावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया विरोधात तीव्र जनआंदोलन  प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केले जाईल व त्याचळी उद्भवनाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, मिडिया प्रभारी नकुल होगे, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर पुंजारे, शहर चिटणीस वैभव संघई इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या