💥संस्कार प्राथमिक शाळेत माता रमाई यांची जयंती साजरी....!


💥या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे यांची उपस्थिती💥 

परळी ; आज संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभाग व विद्यानगर विभाग दोन्ही विभागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात ही रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री आनकाडे सर व पर्यवेक्षक श्री इंगळे सर यांची उपस्तिथी होती.या कार्यक्रमादरम्यान श्री दिपक तांदळे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी माता रमाई यांनी किती यातना सहन केल्या ते सांगितले व म्हणाले अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले.

त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.एवढे बोलून त्यांनी आपली जागा घेतली व अध्यक्षीय समारोप झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज राठोड सर व आभार श्री खारोळकर सर यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या