💥निस्वार्थ सेवेचे व्रत घेऊन धार्मिक सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणाऱ्या गोपाळ महाराजांच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक...!


💥स्वतःच्या कष्टाच्या पैशातून विघ्नहर्ता श्री गणेशाचे मंदिर बांधण्याचा संकल्प महाराजांनी केला अखेर पुर्ण💥 

सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाण्याची निर्मळ वृत्ती अंगी बाळगून आपल्यातील कर्तृत्वाचा प्रत्येकाला परिचय करून देणाऱ्या गोपाळ महाराज कळसे या अवलीयाने वयाच्या २५ व्या वर्षी स्वतःला धार्मिक व सामाजिक कार्यात झोकून दिले तब्बल ३७ वर्षापूर्वी श्री गोपाळराव महाराज यांनी विघ्नहर्ता श्री गणेशाचे मंदिर स्वःखर्चातून बांधण्याचा संकल्प केला होता त्यांनी केलेल्या संकल्पाची पुर्ती त्यांच्या वयाच्या ६२ व्या वर्षी पुर्ण करण्यात त्यांना यश आले असून त्यांच्य संकल्पाचा मुळ उद्देश म्हणजे मरावे पण किर्तीरूपे उरावे हि म्हण आपल्यांना सागते कि आपण किती आयुष्य जगले हे महत्वाचे नाही पण आपण जितके आयुष्य जगलो त्या जगलेल्या आयुष्यात असे स्मरणात राहील असे काही चांगले कार्य केले पाहिजे कि लोक आपल्याला जगाचा निरोप घेतल्यानंतर सुध्दा स्मरण करतील कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आपल्या कष्टातून पैश्याला पैसा जोडून तालुक्यातील मौ.कंठेश्वर येथील गोदावरी-पुर्णा नदीच्या संगमावर असलेल्या ऐतिहासिक पवित्र जागृत देवस्थान कोटेश्वर महादेव देवस्थान परिसरात विघ्नहर्ता श्री गणेशाचे सुंदर असे मंदिर गोपाळ महाराज यांच्या दृढसंकल्पनेतून साकारले आहे.


धार्मिक सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहणारे व निस्वार्थ व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणारे गोपाळ महाराज यांना आयुर्वेदाचा ही गाढा अभ्यास असून त्यांनी अनेक रुग्नांना आपल्या आयुर्वेदीक औषधोपचारातून रोगमुक्त केले आहे त्यांच्या सेवाभावीवृत्ती व धार्मिकतेमुळे त्यांना लोक आदराने महाराज म्हणून बोलावतात नवनाथांसह महादेवाची अपार भक्ती असणारे गोपाळ महाराज यांनी कधीही कोणाकडून कसलीही अपेक्षा केलेली नाही उलट स्वकष्टातून कमावलेल्या एकएक पैश्यातून विघ्नहर्ता श्री गणेशाचे मंदिर बांधकाम करून समाजापुढे आदर्श निर्माण करून धर्माच्या नावावर सोंग करून कोट्ट्यावधी रुपयांची माया जमवणाऱ्या ढोंगी स्वयंघोषीत तथाकथित बुवांना एकप्रकारे चपराक देण्याचे काम केले आहे गोपाळ महाराज यांनी बांधलेल्या श्री गणपती मंदिरात गुरुवार दि.१० फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०-०० ते ०१-०० वाजे दरम्यान श्री गणपती मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून दुपारी ०१-०० ते सायं.०५-०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या श्री गणपती मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाच्या कार्यक्रमात भाविकभक्तांनी आवर्जून उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोपाळ महाराज कळसे व कंठेश्वर येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या