💥पूर्णा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षात जाहिर प्रवेश....!


💥दौऱ्या दरम्यान अधिकाऱ्यांना जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी धरले धारेवर💥

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पूर्णा तालुका संघटक बांधणी संदर्भात जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी काल दि. ०८/०२/२०२२ रोजी पुर्णा येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन वंचित आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी मा. ना. बच्चुभाऊ कडू यांच्या विकासात्मक विचारांना प्राधान्य देत जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला या वेळी उपस्थितांना जिल्हा प्रमुखांनी मार्गदर्शन केले.

दौर्यादरम्यान कार्यकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी कार्यकर्त्यांसह पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांची तहसील कार्यालय येथे भेट घेऊन दिव्यांगासाठीची अंत्योदय योजनेसह संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना यांच्या पगारी व विविध शासकीय योजना तात्काळ राबविण्याच्या सुचना यावेळी दिल्या. शासकीय योजनांची नोंद करण्यासाठी असलेला तहसील कार्यालयातील डाटा इन्ट्री ऑप्रेटर हा खाजगी जागेमध्ये काम करत असून रेशन कार्डसाठी २०० ते २०० रुपयाची बेकायदेशीर मागणी करीत असल्याबाबत पुराव्यासह तक्रार देत या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी टेमकर मॅडम यांच्याकडे करण्यात आली. तहसीलची मोठी इमारत असतानाही डाटा इंट्री ऑपरेटर खाजगी जागेत काम करीत आहे हे अत्यंत चुकीचे असून डाटा एंट्री ऑपरेटरला तात्काळ तहसील कार्यालयात बसण्याची सक्ती करण्याच्या सूचना यावेळी जिल्हा प्रमुख बोधने यांनी दिल्या.

 यानंतर जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पंचायत समिती कार्यालय गाठत गट विकास अधिकारी वानखेडे मॅडम यांची भेट घेऊन पंचायत समितीच्या पाच टक्के दिव्यांग निधी वाटप तसेच घरकुल वाटपात दिव्यांग, निराधार, विधवा व परितक्त्या महिला यांना प्राधान्य देणे बाबत तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांविषयी चर्चा करून दिव्यांगांचा पाच टक्के निधी व  घरकुलातील प्राधान्यक्रम लावणे बाबत संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या सह युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चापडे, मिडिया प्रभारी नकुल होगे, पुर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, उप तालुका प्रमुख बाभन ढोणे, शिवाजीराव खरे, विनायक देसाई, सुशील गायकवाड, रूपला पांढरी चे माजी सरपंच सुभाष गुंडाळे, सुरवाडी ग्रामपंचायत सदस्य गजानन परडे, नरेश जोगदंड, संजय वाघमारे, सुरेश वाघमारे, मदन भोसले, पवन होणे होणाली तपासे, श्रीहरी इंगोले, मयंक कुऱ्हे, रामदास वाघमारे, राजेंद्र डाखरे, बालाजी माहिती, व्यंकटी डाखोरे, रामदेव खंदारे, मुंजाजी खैरे, विश्वनाथ भालेराव, मुंजाजी लोखंडे माधव खंदारे, विठ्ठल घाटोल, रामराव जाधव, सुरेश वाघमारे, शेख मुसा शेख महेबुब, तुकाराम पारवे, हौसाजी तरासे, शेख मुसा शेख गफुर, सिध्देश्वर आगलावे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या