💥आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल उच्चांकी पातळीवर.....!


💥निवडणुकीचा हंगाम संपताच सर्वसामान्य माणसाच्या खिशाला बसणार महागाईच्या झळा💥

💥येत्या काही दिवसात पेट्रोल,डिझेल,गॅस च्या किमती मध्ये होणार मोठी वाढ💥

लेखक ; केदार पाथरकर

आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य माणसाला येत्या काही दिवसांत खनिज तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल,डिझेल,गॅस च्या दरवाढीचा जोरदार शॉक बसणार आहे,सरकारने यासाठीची तयारी सुरू केल्याचे सूत्रांकडून सूतोवाच होत आहे.

गेले वर्षी याच महिन्यात 90 रु लिटरने मिळणारे पेट्रोल आता 120 रुपयांपर्यंत गेले आहे त्यातच आता उत्तर प्रदेश,गोवा आदी राज्यांच्या निवडणुका पार पडताच वाहनधारकांच्या खिशाला मोठा भुर्दंड बसणार आहे,परंतु असे असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी असताना मात्र तेलाचे भाव हे कधीच कमी होताना दिसत नाहीत हे ही एक कोडेच आहे ?


यावर उपाय म्हणून बरेच नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय शोधत आहेत, परिणामी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होते आहे,त्यातही इलेक्ट्रिक वाहने ही छोट्या अंतरासाठी वापरता येणार असल्याने त्यासाठी चार्जिंग स्टेशन जागो जागी उभी करण्यास बराच वेळ लागू शकतो त्यामुळे सध्यातरी वाहनधारकांच्या खिशाला लागणारी झळ आणि परिणामी वाढणारी महागाई कुणीही रोखू शकत नसल्याचे चित्र आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या