💥जिंतूर येथील ट्रामा केअर सेंटर मधील रिक्त पदे तात्काळ भरण्याची रुग्ण हक्क समितीची मागणी....!


💥शहरात असलेल ट्रामा केअर सेंटर हे कर्मचाऱ्यांअभावी कोमात💥

जिंतूर/ बी.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील रुग्णांची हेळ संड आरोग्य ग्रामीण रुग्णालयांमध्ये होत असते कारण यंत्रणा अभावी या कारणाने रुग्ण हक्क संघर्ष समिती तालुका शाखा जिंतूरचे पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येते की, जिंतूर शहरात असलेल ट्रामा केअर सेंटर हे सध्या कोमात गेले असून हे ट्रामा केअर सेंटर म्हणजे समस्यांचे माहेरघर व शोभेची वस्तू बनले आहे. यामुळे येथे परिपूर्ण सोईसुविधा युक्त शासन निर्देशानुसार वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांचे पद तात्काळ भरण्याची कार्यवाही करण्यात यावी,

   कारण की, जिंतूर ट्रामा केअर यूनिट चे उद्घाटन होऊन बरेच वर्ष उलटले तरी नागरिकांच्या सेवेत उपलब्ध नाही.यामुळे अशा भयंकर कोरोना महामारीमुळे व अक्सिडेंट पेशंटचे हाल होत असून अनेकांना ही सुविधा कार्यन्वित न झाल्याने प्राणाला मुकावे लागले आहे. रुग्नालयातील डॉक्टरांची व इतर कर्मचारी यांचे रिक्त पदे भरण्यात आलेली नाही.  यासंबंधी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना खुप त्रास सहन करावा लागत असुन या गंभीर समस्यांची देखील संबंधित जिल्हा प्रशासन यांना गांभीर्य नाही, यासंबंधी जिल्हा प्रशासन तोंडावर बोट ठेऊन आहे. यामुळे रुग्णांची हेडसांड होत आहे. परभणी जिल्ह्यातील तालुक्याच्या तुलनेत जिंतुर तालुक्याची व्याप्ती मोठी असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून परभणी, नांदेड, औरंगाबाद, मुंबई येथे हलविण्यात येते किंवा खाजगी दवाखान्यात रुग्णांना उपचार करावा लागतो.यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासाला रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर यूनिट शोभेची वास्तु बनली आहे. लवकरात लवकर ट्रामा केअर यूनिट मध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांना तात्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात यावे व लवकरात लवकर ट्रामा केअर यूनिट परिपूर्ण सोयी सुविधासह  सुरु न केल्यास व रिक्त पदे न भरल्यास संबंध आमच्या  महाराष्ट्र रुग्ण हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. अड. निलेश करमुडी व जिल्हाध्यक्ष श्री.दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली संलग्न सर्व पदाधिकारी यांच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, ही नम्र विनंती.

जिल्हाध्यक्ष - श्री दिलीप बनकर

जिल्हा संपर्क प्रमुख- शेख रहीम शेख रहीम

तालुकाध्यक्ष जिंतूर - सय्यद फेरोज सय्यद मोईन

तालुका सचिव जिंतूर-  संजय रामराव आडे

महिला तालुकाध्यक्ष- कविता घनसावंत

तालुका महिला उपाध्यक्ष-  प्रतिभाताई हरभरे

जिंतूर शहर संघटक-  मुसा इसाक कुरेशी

तालुका कार्याध्यक्ष ग्रामीण- खयुम खा पठाण, शबीर भाई,

तालुका संघटक - स.रियाज

ग्रामीण तालुका अध्यक्ष- जनार्दन वाकळे, बाबू राज , अहेमद समाज कार्यकर्ते, अमजत पठाण, महेश देशमुख , सचिन पत्रकार,आदी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या