💥संस्कार प्राथमिक शाळेत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी...!


💥कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आनकाडे यांची प्रमुख उपस्तिथी💥

     संस्कार प्राथमिक शाळेत आज दिनांक १५ फेब्रुवारी वार मंगळवार रोजी बंजारा समाजाचे शूर व पराक्रमी संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे साहेब यांची प्रमुख उपस्तिथी होती.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री आनकाडे सर यांची उपस्तिथी लाभली होती.या कार्यक्रमाची सुरुवात ही संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,या प्रसंगी बोलताना शाळेचे सचिव श्री दिपक तांदळे साहेब यांनी सेवालाल महाराजांच्या आयुष्यवर प्रकाश टाकला त्यात त्यांनी म्हणाले की संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र व‌ तेलंगाना राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली.एवढे बोलून त्यांनी आपली जागा घेतली व अध्यक्षीय समारोप झाला.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज राठोड सर तर प्रमुख पाहुण्यांचे आभार श्री बाबर सर यांनी व्यक्त केले.व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उर्वरित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या