💥कु.राधिका सावके एम ए इंग्लिशमध्ये (साहित्य) राज्यातुन पाचवी मेरीट तर जिल्ह्यातुन प्रथम.....!


💥ऊत्कृष्ट हाॅलिबाॅलपटु असलेल्या कु.राधिकेला काव्यरचनेचीही आवड💥

💥शिक्षणात प्रगती करुन इतरांसाठी प्रेरणा बनण्याचा मुलींना दिला संदेश💥

फुलचंद भगत

वाशिम:-अतिशय प्रतिकुल परिस्थितीतुन मार्ग काढत मंगरुळपीर तालुक्यातील गणेशपुर सारख्या खेडेगावातुन शिक्षणात ऊच्चांकी घेत नुकत्याच लागलेल्या निकालात कु.राधिका गजानन सावके हिने अमरावती विद्यापिठातुन एम ए इंग्रजी (साहित्य) या विषयात राज्यातुन पाचवी मेरीट तर वाशिम जिल्ह्यातुन पहिली येवुन वाशिम जिल्ह्याचे नावलौकीक केले आहे.


            खेडेगाव म्हटले की शिक्षणाचा अभावच!आणी त्यातही मुलगी म्हटली की दहावी बारावी पर्यतचे जेमतेम शिक्षण झाले की पालकांना मुलीच्या लग्नाची चिंता आणी घाई दिसुन येते.'मुलीला शिकुन काय साहेबिन व्हायचय?'या माणसिकतेत बहूतांश मुलींना शिकण्याची इच्छा मनातच दाबुन ठेवावी लागते.इंग्रजी विषय म्हटला की नाक मुरडणारी शिक्षणातली पिढी आपण बघतो आणी या इंग्रजिला सोडुन इतर विषयाकडे विद्यार्थी अधिक कल घेतात.पण मंगरूळपीर तालुक्यातील प्रगत समजल्या जाणार्‍या गणेशपुर या छोट्याशा गावात माञ गजानन विठ्ठलराव सावके यांनी आपल्या मुलीला शिकण्यासाठी बळ दिलं.या मिळालेल्या बळामुळेच कु.राधिकाने शिक्षणात ऊंच भरारी घेत वाशिम जिल्ह्यात मानाचा तुरा रोवला आहे.शिक्षणच माणवाच्या प्रगतीचे मुळ आहे ही महापुरुषांची विचारधारा जोपासुन मुलांच्या शिक्षणासाठी सतत प्रेरणा आणी बळ देवुन ऊच्चशिक्षित बनवले.कु.राधिका सावकेने प्राथमिक शिक्षण गणेशपुर येथे घेवुन माध्यमिक शिक्षणासाठी शेलुबाजार येथे प्रवेश घेतला.पाचविनंतर नवोदय विद्यालयाची परिक्षा सर करुन नवोदय वाशिमच्या विद्यालयात प्रवेश निश्चीत केला.पुढे महाविद्यालयीन शिक्षण शेगाव येथे पुर्ण करुन बि.ए.साठी अकोला येथे प्रवेश घेतला.नंतर एम ए अमरावती विद्यापिठातुन पुर्ण करत कु.राधिकाने एम ए इंग्रजी (साहित्य) या विषयात राज्यातुन पाचवी मेरिट तर वाशिम जिल्ह्यातुन पहिली येण्याचा मान मिळवत आईवडिल आणी गुरुजनांची मान अभिमानाने ऊंचावली.कु.राधिका सावकेला खेळातही रुची असुन ती हाॅलिबाॅलपटुही आहे.साहित्यातही विषेश आवड असुन काव्यरचनाही करते.ध्येयवादी बनुन शिक्षणात प्रगती करुन इतरांसाठी प्रेरणा बना अशी ती मुलींना आवर्जुन सांगते.तसेच 'सेट' आणी 'पेट' या परिक्षेमध्ये ऊतिर्ण होवून सहा.प्राध्यापिकासाठीही पाञ झाली आहे.कु.राधिकाचे वडिल हे अल्पभुधारक शेतकरी असुन त्यांना एक मुलगी आणी एक मुलगा आहे.त्यांच्या मुलानेही पिएचडी केली असुन त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीमुळे इतरांनाही प्रेरणा मिळत आहे.खेडेगावातुन इंग्रजी सारख्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी यासाठी आईवडिलांचे योगदान आणी गुरुजनांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असल्याचे कु.राधिका सावके अभिमाने सांगते....

खेड्यात मुलींबाबतीत अजुनही दुय्यम वागणुक मिळत असुन जेमतेम शिक्षण झाल्यावरच लग्नाच्या बंधनात मुलींना अडकवुन देतात.अशा स्थितीत मुलींनी जिद्दीने व आत्वविश्वासाने ऊच्च शिक्षण पुर्ण करुन स्वबळावर ऊभे राहावे आणी आपल्या यशाने आईवडीलांची मान मुलींनी ऊंचवावी आणी इतरांसाठी प्रेरणा बनावे.

  - कु.राधिका गजानन सावके

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या