💥पाथरी तालुक्यातील रेणापुर येथे विजतार तुटल्याने एक एक्कर उस जळाला...!💥या विषयी सदरील शेतकऱ्याने विजवितरणच्या उपविभागिय अभियंत्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची केली मागणी💥

किरण घुंबरे पाटील

पाथरी:-तालुक्यातील रेणापुर येथे ऊसाच्या शेतातून गेलेली विज प्रवाह करणारी तार तुटल्याने एका एकरातील ऊस जळून खाक झाला.ग्रामस्थांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.या विषयी सदरील शेतकऱ्याने विजवितरणच्या उपविभागिय अभियंत्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.


या विषयी मिळालेली माहिती अशी की,रेणापुर येथील शेतकरी परमेश्वर भगवानराव टेंगसे यांचे गट क्र २९६ मध्ये एक एक्कर उसाचे पिक होते.  शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास परमेश्वर टेंगसे यांच्या शेतातून गेलेली विजप्रवाह करणारी विजेची तार तुटल्याने  ऊसाच्या पिकाला आग लागली यात एक एक्कर उस जळून खाक झाला.आग लागल्याची घटना ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी ऊसाच्या शेताकडे धाव घेत आग विझवली. ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर शेजारील चार एक्कर उस जळून अजून मोठे नुकसान झाले असते. विषेश बाब म्हणजे या शेतक-याच्या ऊसची तोडणी तारीख येऊन गेली तरी रेणूका शुगर्सच्या शेतकी विभागाने ऊस तोड केली नसल्याचा आरोप शेतक-याने केला आहे.वेळेत उस तुटून गेला असता तर नुकसान टळले असते असे रेणापुर ग्रामस्थ सांगतात. दरम्यान सदरील शेतक-याने पाथरीच्या विजवितरण उपअभियंत्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या