💥जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे जमादारास मारहाण....!


💥आरोपी प्रकाश साहेबराव वाकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे💥

जिंतूर / बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१३ फेब्रुवारी) : जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे येथे कामावर कार्यरत असलेले ठाणे जमादार यांना मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी (दि.११) फेब्रुवारी रोजी दुपारी घडली आहे. आरोपी प्रकाश साहेबराव वाकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शुक्रवारी दि.११ फेब्रुवारी रोजी फिर्यादी ठाणे जमादार सतीश श्रीरंग मोरे हे ठाणे जमादार कर्तव्य निभावत असताना तक्रारदार मिलिंद चोरमारे राहणार वझर हे तक्रार घेऊन आले असता त्यांचे सोबत प्रकाश वाकळे ही आले होते. ठाणे जमादार सतीश मोरे हे तक्रारदार यांच्यासोबत विचारपूस करीत असताना एका पब्लिक एनसी चे हे प्रकरण तुम्ही कोर्टात घेऊ शकता असे ठाणे जमादार म्हणत असताना आरोपी प्रकाश वाकळे यांनी तुम्ही आम्हाला कोण सांगणार आम्हाला कळतय काय करायचे असे म्हणत ठाणे जमादार सतीश मोरे यांना शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण करीत ठाणे जमादार यांची बक्कल नंबर ची नेमप्लेट तोडली व कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून आरोपी प्रकाश साहेबराव वाकळे यांच्याविरुद्ध ठाणे जमादार सतीश मोरे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास  पोलीस निरीक्षक वसंत मुळे हे करीत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या