💥प्रतिकूल परिस्थितून मेडिकलला लागलेल्या विद्याथ्यांचा केला कॉलेज ने सत्कार....!


💥ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या वतीने आज त्याच्या माणकेश्वर येथील घरी जाऊन करण्यात आला सत्कार💥

जिंतूर/ प्रतिनिधी

जिंतूर ; येथील डि.एस.एम कॉलेजचा विद्यार्थी निलेश घनसावध याचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे नुकताच एम बी बी एस ला प्रवेश झाला आहे. निलेशने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणकेश्वर येथून ये-जा करून जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि घरीच राहून नीट ची तयारी केली व एमबीबीएसला प्रवेश मिळवला.

ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या वतीने आज त्याच्या माणकेश्वर येथील घरी जाऊन निलेश ,त्याचे आई-वडील,आजी आजोबा व संपूर्ण परिवाराचा सत्कार करण्यात आला निलेश आणि त्याच्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन व निलेश च्या पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या