💥नागापुर येथील जुन्या पिढीतील रतनबाई जैस्वाल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन...!


💥त्यांच्या पश्चात ४ मुले एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे💥

परळी वैजनाथ (दि.७ फेब्रुवारी) : तालुक्यातील नागापुर येथील रतनबाई श्रीरामलाल जैस्वाल यांचे सोमवार दि.७ फेब्रुवारी रोटी पहाटे ०४-०० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले आहे. श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व जैस्वाल रेडीओ ईलेक्ट्रॉनिक्सचे मालक पवनकुमार जैस्वाल यांच्या त्या मातोश्री होत्या.

     नागापुर येथील जुन्या पिढीतील रतनबाई श्रीरामलाल जैस्वाल (वय ९०) यांचे नागापुर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर नागापुर येथे सोमवारी (ता.७) दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. राख सावडण्याचा विधी बुधवारी (ता.९) सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात चार मुले प्रदिपकुमार जैस्वाल, पवनकुमार जैस्वाल, शिवकुमार जैस्वाल, संतोषकुमार जैस्वाल, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या