💥परभणी-वसमत रस्त्याच्या अर्धवट कामाने घेतला कामगार महिलेसह अवघ्या दहा महिण्याच्या बालकाचा बळी...!

 


💥परभणी-वसमत मार्गावरी विश्वशांती ज्ञानपीठ जवळ ॲटो पल्टी झाल्याने घडली दुर्दैवी घटना ; घटनेच पतीही जखमी💥  

परभणी (दि.०१ फेब्रुवारी) - परभणी-वसमत मार्गाच्या अर्धवट कामाने आज मंगळवार दि.०१ फेब्रुवारी रोजी सकाळी ०६-३० वाजेच्या सुमारास पुर्णा तालुक्यातील बरबडी येथील गरीब कामगार महिलेसह तिच्या अवघ्या दहा महिण्यांच्या बालकाचा परभणी येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालया मार्फत मिळणाऱ्या पेटी व अन्य कामगार साहित्य मिळवण्यासाठी ॲटोने जात असतांना सदरील ॲटो पलटी झाल्याने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत कामगार पती सुध्दा गंभीर जखमी झाल्याचे समजते.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की पुर्णा तालुक्यातील बरबडी (सोलव) येथील कामगार पती मुंजाजी शिंदे व त्यांची कामगार पत्नी साता नवसाने लग्नाच्या दहा वर्षांनी झालेल्या अवघ्या दहा महिण्याच्या बाळाला सोबत घेऊन आज मंगळवार दि.०१ फेब्रुवारी रोजी भल्या पहाटे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालया मार्फत मिळणाऱ्या पेटी व अन्य कामगार साहित्य मिळवण्यासाठी लवकर गेले तर तात्काळ नंबर लागेल या उद्देशाने ॲटोने परभणी येथील कामगार कल्याण कार्यालयात जात असतांना परभणी-वसमत रस्त्यावरील त्रिधारा जवळील विश्वशांती ज्ञानपीठ जवळील अर्धवट काम झालेल्या रस्त्यावर पहाटे ०६-३० वाजेच्या सुमारास त्यांचा ॲटो पलटी झाल्यामुळे कामगार मुंजाजी शिंदे यांच्या कामगार पत्नी पद्मावती मुंजाजी शिंदे वय २५ वर्षे व अवघ्या १० महिण्यांचा मुलगा वैभव मुंजाजी शिंदे यांच्या जागेवरच मृत्यू झाला तर मुंजाजी शिंदे हे या दुर्घटनेत जखमी झाले असून या घटने मुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांविरूध्द मनुष्यवधाच्या गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे....


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club
    Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club luckyclub Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky Club Lucky

    उत्तर द्याहटवा