💥पुर्णा नगर परिषद निवडणूकीत अकार्यक्षम राजकारण्यांना जनतेला भुलथापा देण्यासाठी घ्यावा लागणार महापुरूषांचा आधार....!


💥संधीसाधू लोकप्रतिनिधींनी विकासाच्या नावावर साधला स्वतःचा सर्वांगीन विकास कोट्ट्यावधींची काम तरीही शहर भकास💥

पुर्णा ; 'जगात जर्मनी भारतात परभणी अन् परभणीत पुर्णा आणि राजकारण्यांना गिळायला इथे काहीही पुरना' अशी अवस्था येथील भ्रष्ट राजकारण्यांची झाली असून शहरासह निवडून आलेल्या प्रभागात विकासाचे सोंग करून आलेला शासकीय विकासनिधी थातूर मातूर विकास काम करून गिळकृत करता कसा येईल या एकमेव उद्देशाने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवायची आणि अंधारात छुपी युती करून एकमेकांना आधार देत आलेला शासकीय विकासनिधी समसमान वाटण्या करून गिळकृत कसा करायचा हा अनोखा उद्योग यांनी आरंभल्यामुळे शहराचा दिखाऊ विकास झाल्याचे निदर्शनास येत आहे.

शहरातील ज्या भागांमध्ये आवश्यकता नाही अश्या भागात सिमेंट रस्ते अंडरग्राऊंड नाल्यांची बांधकाम समाज मंदिरांची बांधकाम करून कोट्ट्यावधी रुपयांची उधळण करण्यात आल्याचे निदर्शनास येत असून मुंबई सारख्या ठिकाणी ज्या दराने रस्ते नाल्यांसह समाज मंदिरांची बांधकाम होत नाहीत त्या अव्वाच्या सव्वा दरान अंदाजपत्रक तयार करून विविध शासकीय योजनांचा विकासनिधी घश्यात घालण्याचा उद्योग सोईस्कररित्या करण्यात आल्याचे  निदर्शनास असून दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्ट्यावधी रुपयांचा निधी आवश्यकता नसलेल्या ठिकाणी विकासकाम दाखवून उधळण्यात आला परंतु ज्या भागात दलित वस्ती सुधार निधीतून विकास काम व्हायला हवी होती त्या भिमनगर आण्णाभाऊ साठे नगरातील साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे समाज मंदिराची झालेली पडझड भिमनगर परिसरातील भैयासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे अर्धवट झालेले बांधकाम शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या आनंद नगर,आदर्श कॉलनी,अलंकार नगर,बोर्डीकर प्लॉटींग परिसरातील पाणी पुरवठा पाईपलाईनचा गंभीर प्रश्न मात्र या भ्रष्टाचाऱ्यांना का दिसले नसावे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील नागरी वसाहतीतील नाल्यांची रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेकडे सपशेल दुर्लक्ष करून ज्या वसाहतींमध्ये आवश्यकता नाही अश्या नव्याने प्लॉटींग झालेल्या भागात संबंधित प्लॉटींग धारकाशी आर्थिक हितसंबंध जोपासत प्लॉटच्या खैरातील शासकीय विकासनिधीतून लाखों रुपयांतून रस्ते नाल्यांची थातुरमातूर झालेली बांधकाम शासकीय निधीचा अपहारचा म्हणावा लागेल ना ? सन २०१६ यावर्षी झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत जनमतातून निवडून आलेल्या नगराध्यक्षा गंगाबाई सितारामआप्पा एकलारे व त्यांचे प्रतिनिधी संतोष एकलारे यांनी नगर परिषद नुतन इमारत बांधकाम,छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल,शहराला जोडणारा मुख्य डांबर रोडसह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसराचे सुशोभिकरण तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसरात सुशोभिकरण तसेच शहरातील प्रमुख मार्गांवर भव्य स्टेट लाईट बसवण्याची दिसती कामे करून उद्घाटन व प्रसिध्दीवर कोट्ट्यावधी रुपयांचा विकासनिधी खर्च केल्याचे दिसत असले तरीही येणाऱ्या नगर परिषद निवडणूकीत मात्र विकासाच्या नावावर कोट्ट्यावधी रुपयांचा विकासनिधी जिरवणाऱ्यांना शेवटी आपआपल्या अविकसित प्रभागातून निवडून येण्यासाठी लक्ष्मीअस्त्रासह महापुरुषांच्या नावाचाच आधार घ्यावा लागणार असल्याचे निदर्शनास येत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या