💥राज्याचे मा.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मार्च मध्ये वाशीम जिल्हा दौऱ्यावर....!


💥कायदा व सुव्यवस्था आदी विषयातील विविध समस्या व नियोजन या संदर्भात आढावा घेणार💥

(फुलचंद भगत)

वाशिम (दि.०८ फेब्रुवारी) :-राज्याचे गृहमंत्री मा. श्री दिलीप वळसे पाटील यांचे निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, कारंजा नप माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके,रांका प्रदेश सचिव श्री बाबारावजी खडसे,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक श्री अशोक भाउ परळीकर व अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक श्रीमती सोनालीताई ठाकूर यांनी ८ फेब्रुवारी रोजी भेट घेऊन वाशिम जिल्ह्यातील विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली या भेटी दरम्यान वाशिम जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आदी विषयातील विविध समस्या व नियोजन या संदर्भात समीक्षा  व पक्ष प्रसार व विस्तार या बाबतीत आढावा घेण्यासाठी मा. गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील पुढील महिन्यात मार्च मध्ये वाशिम जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांची विचारधारा घरा घरात पोहचवून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व्यापक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे मा श्री वळसे पाटील यांनी या चर्चे दरम्यान कळविले आहे.त्यांच्या वाशिम जिल्हा दौऱ्याने निश्चितच राष्ट्रवादी पक्षाच्या  प्रसार व विस्तार कार्याला गती मिळेल.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या