💥प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांचा पुर्णा तालुका दौरा ठरला वादळी....!


💥तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने व तालुकाध्यक्ष सोनटक्के यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश💥 

परभणी (दि.०८ फेब्रुवारी) - परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने हे आज मंगळवार दि.०८ फेब्रुवारी २०२२ रोजी पुर्णा तालुका दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदरील बैठकीत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.


या दौऱ्या दरम्यान त्यांनी पुर्णेच्या तहसील तहसिलदार पल्लवी टेमकर यांची भेट घेऊन दिव्यांगांसाठीची अन्तोयदय योजनेसह विविध शासकीय योजना तात्काळ राबविण्याच्या सूचनाही केल्या यावेळी त्यांनी डाटा एंट्री ऑपरेटर तहसील कार्यालयात तात्काळ उपलब्ध करावा तसेच राशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठी व  वगळंण्यासाठी सदरील ऑपरेटर राशन कार्ड धारकांकडून दोनशें ते तिनशें रुपयांची बेकायदेशीर आकारणी करीत असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही यावेळी तहसिलदार टेमकर यांच्याकडे बोधने यांनी केली.यानंतर जिल्हाध्यक्ष बोधने यांनी पुर्णा पंचायत समिती कार्यालयास भेट देऊन बिडीओ वानखेडे यांची भेट घेऊन तालुक्यातील दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी तात्काळ वितरित करण्याची मागणीही केली.


💥पुर्णा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश ;-


प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांच्या उपस्थितीत आज तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला यात नरेश जोगदंड गौर,शिवाजीराव खरे आलेगाव,सुभाष गुंडाळे माजी सरपंच रुपला पांढरी,मदनकुमार भोसले रुपला पांढरी,व्यंकटी डाखोरे,रामदास वाघमारे धानोरा मोत्या,मुंजाजी लोखंडे सातेफळ,बबन ढोणे,पवन ढोणे,मुंजाजी खैरे पांगरा (ढोणे),मंचक कुऱ्हे खुजडा,बालाजी मोहीते,विश्वनाथ भालेराव महागाव,राजेंद्र डाखोरे बरबडी,माधव खंदारे आहेरवाडी,विठ्ठल घाटोल आलेगाव,श्रीहरी इंगोले,रामराव जाधव देगाव,सुरेश वाघमारे कावलगाव,शेख मुसा शेख महेबुब,तुकाराम पारवे,शेख मुसा शेख गफ्फूर गौर,हैसाजी तरासे,आनंद वानखेडे पेनूर,सिध्देश्व आगलावे सारंगी,गजानन परडे ग्रामपंचायत सदस्य सुरवाडी,मंचक वैद्य अजदापूर,चांदू सोलव बरबडी आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री जलसंपदा विभाग बच्चूभाऊ कडू व परभणी जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने,पुर्णा तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.


प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी दिली 'जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स कार्यालयाला सदिच्छा भेट ;-


परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगभाऊ बोधने यांनी आज मंगळवार दि.०८ फेब्रुवारी रोजीच्या पुर्णा तालुका दौऱ्या दरम्यान पुर्णेतील लोकमान्य टिळकरोड परिसरातील जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स परिवाराच्या वतीने व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशनच्या वतीने संपादक/संस्थापक चौधरी दिनेश व शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व अजितन्युज हेडलाईन्सचे प्रतिनिधी रामा पारवे यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी जिल्हाध्यक्ष शिवलिंगभाऊ बोधने यांनी अल्पावधीत लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या व जनहीताशी बांधालकी जोपासत निर्भीडपणे वृत्ताकन करणाऱ्या अजित न्युज हेडलाईन्सचे कौतुक केले व संपादक/संचालक चौधरी दिनेश यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळी त्यांच्या सोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के,दैनिक देशोन्नतीचे ग्रामीण प्रतिनिधी नारायन सोनटक्के यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पस्थितीत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या