💥अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.सुनील केंद्रेकर यांनी बजावली आहे💥
परभणी (दि.०६ जानेवारी) : मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यातही कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असून संबंधित जिल्हा प्रशासनाने आपआपल्या जिल्ह्यांमधून सर्वतोपरी खबरदारी बाळगावी अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर यांनी बजावली आहे.
मराठवाड्यात कोरोना,ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकार्यांबरोबर केलेल्या चर्चेतून आपआपल्या भागात खबरदारी म्हणून काय काय उपायययोजना करता येईल या विषयीसुध्दा विचारविनिमय केला. यावेळी आयुक्त केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून कोरोनाचे व ओमायक्रॉन संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत, असे स्पष्ट करीत या विषाणूच्या वेगाने होणार्या प्रादुर्भावामुळे भविष्यात संख्या वाढल्यास संबंधित प्रशासनाने दोन लाटेतील भक्कम अनुभवाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी उपाययोजना अवलंबवाव्यात,असे निर्देश दिले.
सध्याची परिस्थिती तिसर्या लाटेची चाहूल असून दुसर्या लाटेत दोन हजार रुग्ण होते, यावेळी एकाच दिवसात १० हजार रुग्ण आढळण्याचे प्रमाण राहू शकते. ७० ते ८० टक्के रुग्ण घरीच बरे होतील. ज्यांना जास्त त्रास होईल, त्यांच्यावर उपचार करावे लागतील. दुसर्या लाटेच्या तुलनेत तयारी खूप केली असली, तरी रुग्णसंख्या वाढल्यानंतर ताण वाढू शकतो. सध्या तीन ते चार दिवसात रुग्ण बरे होत आहेत. परंतु घरात एक जण पॉझिटिव्ह आला तर इतरांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावीच लागणार आहे. अशा सूचना आयुक्त केंद्रेकर यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, दुसर्या लाटेत मार्च २०२१ रोजी विभागातील आठ जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण मिळून ६८७ रुग्ण कोरोनाग्रस्त होते. १६ मार्च रोजी हा आकडा २६०० पर्यंत गेला होता. शहरी भागात १४४२,तर ग्रामीणमध्ये ११५८ रुग्णांची नोंद झाली होती.५३६ कन्टेन्मेंट झोन विभागात होते. दुसर्या लाटेत मृत्यूदर कमी असणे, एवढीच जमेची बाजू त्यावेळी होती.
विभाग तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर...
मराठवाडा कोरोना संसर्गाच्या तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर असून, नववर्षाच्या पहिल्या पाच दिवसात विभागात ६०७ वर कोरोना रुग्णांची भर पडली आहे. चार महिन्यानंतर रुग्णसंख्येचा आकडा वाढला आहे. विभागात १ जानेवारीला ६६ रुग्ण होते. त्यात औरंगाबाद १५ तर लातूरमधील १८ रुग्णांचा समावेश होता. २ जानेवारीला १०८ नवीन रुग्णांची भर पडली. ३ जानेवारीला पुन्हा १११ नवीन रुग्णांची भर पडली.६०७ रुग्णांमध्ये औरंगाबादच्या २१६ रुग्णांचा समावेश आहे....
0 टिप्पण्या