💥पुर्णा तालुक्यातील फुकटगावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा 'विद्यार्थी अभ्यास फलक' हा कौतुकास्पद उपक्रम...!


💥शिक्षक आबनराव पारवे यांनी स्वतः 11 दर्जेदार अशा विद्यार्थी अभ्यास फलकांची गावातील सर्व भागात केली निर्मिती💥

पुर्णा (दि.20 जानेवारी) -तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे "शाळा बंद..पण शिक्षण चालू" असा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम या शाळेतील सहशिक्षक आबनराव पारवे यांनी स्वतः 11 दर्जेदार अशा विद्यार्थी अभ्यास फलकांची गावातील सर्व भागात निर्मिती केली.


तालुक्यातील फुकटगावात इंटरनेट सेवा व्यवस्थित चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून गावकऱ्यांच्या,सर्व शिक्षकवृंद व  विद्यार्थ्यांच्या सहकार्याने फलक तयार करण्यात आले. या फलकांद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ ज्या-त्या ठिकाणी सहज अभ्यास घेणे शक्य होत आहे.

शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना या अभ्यास फलकाद्वारे सहज शिकणं,अभ्यास घेणं सोपं झालं आहे. या उपक्रमाविषयी गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे शिक्षक दररोज या फळ्यांवर अभ्यास देतात. विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार दिलेला अभ्यास वहीत उतरवून घेतात व घरी जाऊन सोडवितात. या फळयांद्वारे अध्यापन केले जात नाही फक्त अभ्यास दिला जातो. दिलेल्या प्रश्नांची उत्तरसूची फलकप्रमुखाकडे दिलेली असते त्या उत्तरसुचीनुसार फलकप्रमुख अभ्यास तपासून देतात.

या उपक्रमामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त करीत मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या