💥पूर्णा शहरातील उच्चभ्रू वसाहतींमधील नागरिक अद्यापही नगर परिषद पाणी पुरवठा योजनेपासून वंचित....!


💥शहरातील आनंद नगर,अमृत नगर व आदर्श कॉलोनी या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवा - मनसे 


💥उपरोक्त भागात जलकुंभ किंवा जलवाहिनी टाकून कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवा मनसेची निवेदनाद्वारे मागणी💥 

पूर्णा (दि.३१ जानेवारी) - शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद नगर,आदर्श कॉलोनी,अमृत नगर,राजे संभाजी नगर,अलंकार नगर आदी भागातील नागरिक अद्यापही नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेपासून वंचित असून संबंधित भागातील पाणीपुरवठा योजनेवर अनेक वेळा लाखों रुपयांचा निधी खर्च केल्यानंतर सुध्दा या भागातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नसल्यामुळे सदरील भागात गेल्यां विस ते पंचवीस वर्षा पासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेड़सावत आहे या परीसरातुन घर पट्टी,नळ पट्टीच्या माध्यमातुन नगर परिषद प्रशासनाला लाखों रुपयाचा महसुल मिळतो परंतु या भागातील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की दरवर्षी या भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो परंतु या भागातील मतदार जनतेने निवडून दिलेले अकार्यक्षम लोकप्रतिनिधी केवल वेळ काढू धोरन राबवून हा प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरतात.


शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद नगर आदर्श कॉलोनी अमृत नगर राजे संभाजी नगर अलंकार नगर या भागासाठी पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी अनेक वेळा लाखों रुपयाचा निधि मिळाला परंतु सदरील लाखो रुपयांचा शासकीय निधी कागदोपत्री पाणी प्रश्नावर खर्च केल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र कुठलीही कामे झालीच नाहीत या भागात व्यापारी,नौकरदार वर्ग मोठ्या संख्येने राहतो या प्रश्नावर आवाज़ उठवाला मात्र कोणीही पुढे येत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल गेल्यां वर्षा पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून आनंद नगर आदर्श कॉलोनी अमृत नगर अलंकार नगर आदि भागासाठी जलकुंभ किंवा जलवाहिनी टाकून कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवन्याची मागणी करीत आहे.

परंतु परिसरातील नागरिकांचे फार मोठे दुर्दैव म्हणावे लागेलषकी नगर परिषद प्रशासन या भागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यास कुठलेही ठोस पाऊल उचलत नाही नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर पालिका समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल आशा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना मनसेचे शहराध्यक्ष गोविंद (राज) ठाकर यांच्या वतीने देण्यात आला असून निवेदनावर पंकज राठोड,शेख गौस, बालाजी वाघ,राजेश यादव,पवन बोबडे,गुरु पूरी यांच्यासह वार्डातील सेकड़ो नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या