💥श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटइ.एम.इ.जलंधर आणि आर्टलेरी नाशिक मध्ये अंतिम सामना...!


💥तिसऱ्या स्थानासाठी कॉर्प्स आणि डेक्कनची टक्कर💥 

✍️रवींद्रसिंघ मोदी 

नांदेड (दि.8 जानेवारी) : येथील खालसा हायस्कूलच्या मिनी स्टेडियम येथे सुरु असलेल्या 48 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटचा अंतिम सामना रविवार, दि. 9 जानेवारी रोजी इ. एम. इ. जलंधर आणि आर्टलेरी नाशिक संघादरम्यान खेळला जाणार आहे. अंतिम सामना सकाळी दहा वाजता प्रारंभ होईल. तत्पूर्वी सकाळी 8 वाजता दरम्यान तिसऱ्या स्थानासाठी कॉर्प्स ऑफ सिग्नल जालंधर आणि डेक्कन हैदराबाद मध्ये सामना खेळला जाईल. अशी माहिती टूर्नामेंट कमेटीचे मुख्य संयोजक स. गुरमीतसिंघ नवाब यांनी दिली. दरम्यान आज खेळले गेलेल्या सामन्यात इ.एम.इ. जालंधर आणि आर्टलेरी नाशिक संघानी ट्रायब्रेकरच्या रुपात विजय मिळवून अंतिम सामन्यासाठी जागा निश्चित केली. 


शनिवारी दुपारी उपांत्य फेरीचे दोन सामने खेळविले गेलेत. त्यात पहिला सामना इ. एम. इ. जलंधर विरुद्ध कॉर्प्स ऑफ सिग्नल जालंधर संघात खेळला गेला. दोन्ही संघ बलाढ्य असल्याने सुरुवाती पासूनच गोल करण्यासाठी एकमेका विरुद्ध हल्ले चढवले गेले. खेळाच्या दुसऱ्या सत्रात, 25 व्या मिनिटाला इ. एम. इ. च्या गुरजिंदरसिंघने आपल्या संघसाठी पहिला गोल केला. हा गोल मैदानी स्वरूपाचा होता. पण कॉर्प्सने दोन मिनिटाला प्रतिहल्ला चढवत मैदानी गोल केला. अंकुश ने हा सुरेख गोल केला. तिसऱ्या सत्रात, 35 व्या मिनिटाला इ.एम.इ. च्या जगज्योत ढिल्लन ने मैदानी गोल साधला व संघाला बढत मिळवून दिली पण कॉर्प्सच्या अंकुशने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवत 36 व्या मिनिटाला गोल साधला व गोल तालिका बरोबरीवर आणून सोडली. दोन्ही संघाची गोल संख्या समान असल्यामुळे ट्रायब्रेकर द्वारे निर्णय घेण्यात आले. त्यात इ.एम.इ. चा संघ वरचढ ठरला. इ.एम.इ. संघाने 4 विरुद्ध 2 असा सामना जिंकला. 


आजचा दूसरा उपांत्य फेरी सामना पहिल्या सामन्या सारखाच झाला म्हंटलं तर वावगं होणार नाही. आर्टलेरी नाशिक आणि डेक्कन हैदराबाद संघांमध्ये पार पडलेल्या या सामन्याचा निकाल देखील ट्रायब्रेकरने घेण्यात आला. खेळाच्या प्रारम्भिक चौथ्या मिनिटाला डेक्कन संघाला मिळालेल्या एका पेनल्टी कार्नरचे फिरोज फरहत याने गोल मध्ये करून संघाला खाते उघडून दिले. खेळाच्या दुसऱ्या सत्रात 25 व्या मिनिटाला नाशिक संघाला पेनल्टी कार्नर मिळाले आणि बुधराम याने त्याचा लाभ घेत गोल केला आणि आपल्या संघासाठी बरोबरी साधली. तिसऱ्या सत्रात नाशिक संघाच्या मनप्रीतसिंघ याने पेनल्टी कार्नर मध्ये संघासाठी दूसरा गोल नोंदवला. पण 36 व्या मिनिटालाच डेक्कन संघाने पेनल्टी कार्नर मध्ये गोल करत गुणतालिकेत बरोबरी साधली. दूसरा गोल देखील फिरोज फरहत यानेच केला. शेवटी दोन्ही संघांचे स्कोर 2 वि. 2 (गोल संख्या) समान असल्यामुळे ट्रायब्रेकरने सामन्याचे निकाल घेण्यात आले. यात नाशिक संघाने "4 वि 2" गोल अंतराने विजय मिळविला. उद्याच्या अंतिम सामन्यासाठी इ. एम. इ. जालंधर आणि आर्टलेरी नाशिक या दोन्ही सैन्य संघ मैदानात उतरणार आहेत. तसेच तिसऱ्या स्थानासाठी कॉर्प्स ऑफ सिग्नल जालंधर आणि डेक्कन हैदराबाद बाजी लागणार आहे. वरील सामन्यांचा रसिकांनी अस्वाद घ्यावा असे आवाहन स. गुरमीत सिंघ नवाब व संयोजन समिती सदस्यांनी केले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या