💥परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या डासाळा येथील जिल्हा मद्यवर्ती बँकेची ५ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवली....!


💥सेलू पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे💥

परभणी (दि.०४ जानेवारी) : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या डासाळा गावातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची सुमारे ५ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी सिनेस्टाईल पध्दतीने  पळवल्याची घटना आज मंगळवार दि.०४ जानेवारी २०२२ रोजी घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली असून नवीन वर्षात गुन्हेगारांनी डोके वर काढून पुन्हा एकदा जिल्ह्यातील पोलिस दला समोर आव्हान उभे केले असून नुतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी परभणीत दोन युवकांच्या निर्घुन हत्या झाल्याची घटना ताजीच असतांना आज पुन्हा चोरट्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची लाखों रुपयांची रक्कम लुटल्याची घटना घडली आहे.

    सेलू तालुक्यातील डासाळा शाखेचे शाखाधिकारी केशव मांडे व रोखपाल बालासाहेब जाधव हे दोघे सेलूतून आज मंगळवार दि.०४ जानेवारी रोजी सकाळी रोख रक्कम घेवून निघाले तेंव्हा देऊळगाव गात पाटीजवळ विना क्रमांकाच्या दोघा मोटारसायकलस्वारांनी या दोघा कर्मचार्‍यांच्या डोळ्यात स्प्रे मारला अन् ५ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी गायब केली. परंतु, कर्मचार्‍यांनी तात्काळ तो प्रकार सेलू पोलिसांना कळविल्या पाठोपाठ पोलिस उपनिरीक्षक साईनाथ अनमोड, उमेश बारहाते, आप्पा वराडे व शेख गौस यांनी या चोरट्यांचा पाठलाग करीत मानवत तालुक्यातील रुढी पाटीजवळ चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा चोरट्यांनी त्या रकमेतील पावणे दोन लाख रुपये रस्त्यावर फेकून पोबारा केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला परंतु, ते पुढे पसार झाले.

दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या