💥परभणीची ज्योती गवतेने पटकावले ढाका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक....!


💥गवते ही मराठवाडा एक्सप्रेस म्हणून सर्वदूर सुपरिचित आहे💥

परभणी (दि.१२ जानेवारी) - बांगलादेशाची राजधानी ढाका येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत मुंबईची आरती दत्तात्रय पाटील हिने प्रथम तर परभणीची ज्योती गवते हिने द्वितीय क्रमांक पटकावला बंगाबंधू आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत या दोघींनी मंगळवारी रात्री हे यश पटकावले.


परभणीची गवते ही मराठवाडा एक्सप्रेस म्हणून सर्वदूर सुपरिचित आहे. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत तिने तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावला. अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मँरेथाँन स्पर्धेत ज्योती गवते हिने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. ढाका येथील मॅरेथॉन स्पर्धेत तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिच्यावर परभणीच्या क्रिडाक्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या