💥पूर्णेत संभाजी ब्रिगेड आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर (केडर कम्प) संपन्न...!


💥कोणत्याही पोथी पुराणात शेती कशी करावी यांचे धडे दिले नाहीत म्हणून कुणबी पोट भरण्यातच दिवसरात्र शेतात राबतो - शिवश्री गंगाधर बनबरे 

पूर्णा (दि.०४ जानेवारी) - येथिल अभिनव विद्या विहार प्रशालेच्या सभागृहात रविवार दि.०२ जानेवारी २०२२ रोजी मराठा सेवा संघ शाखा पूर्णा आयोजित संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर (केडर कम्प) घेण्यात आला. यावेळी उदघाटक म्हणून जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भुसारे,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.दत्तात्रय वाघमारे व मार्गदर्शक म्हणून गंगाधर बनबरे आदींसह संबाजी भोसले,बालासाहेब यादव,नवनाथ जाधव,ज्येष्ठ सेवानीवृत्त मुख्याध्यापक हिराजी भोसले,गोपाळ भुसारे,सोपान भुसारे,गुलाब इंगोले अदीची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पूर्ण दिवस मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी बोलतांना मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवश्री गंगाधर बनबरे म्हणाले की कोणत्याही पोथी पुराणात शेती कशी करावी यांचे धडे दिले नाहीत म्हणून कुणबी समाज पोट भरण्यातच दिवस रात्र शेतात राबतो शेतीचे पूर्ण माहीती झाल्यावर प्रबोधन व परीवर्तन घडवण्यासाठी मणुष्य धडपडतो असे प्रतिपादन ही त्यांनी केले मराठा सेवा संघ तालुका कार्यकारणीत ॲड.गोविंद ढोणे,कारण शिंदे .भरत बोबडे,महेश कदम ,गोपाळ डाखोरे ,कंठी बोबडे अदीची निवड करण्यात आली. दिनदर्शिका व विविध ग्रंथ वाटप करण्यात आली .कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी ग्रामीण भागातील तरुण उपस्थीत होते.प्रास्ताविक प्रल्हाद कर्हाळे सुत्रसंचालन  साहेब शिंदे व आभार तालुकाध्य गंगाधर कदम यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या