💥नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा येथे बाबा दीपसिंघजी शहीद यांचा जन्मोत्सव साजरा...!


💥गुरुद्वाराचे कथाकार भाई सरबजीतसिंघ निर्मले यांनी बाबा दीपसिंघजी यांच्या जीवनावर आधारित कथा केली💥

नांदेड़ (दि.28 जानेवारी) : येथील चार साहिबजादे सेवक जत्था तर्फे शीख इतिहासात महान हौतात्म्य पत्करणारे बाबा दीपसिंघजी शहीद यांचा जन्मोत्सव कार्यक्रम श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. या निम्मित चार साहिबजादे सेवक जत्था तर्फे गुरुवार, दि. 27 जानेवारी रात्री 8 ते 10 वाजता दरम्यान श्री सुखमनी साहेबचे पाठ आणि शबद कीर्तन करण्यात आले. तसेच इतर धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमास गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी आपली उपस्थिती दर्शवून भाविकांना शुभेच्छा दिल्या. गुरुद्वाराचे कथाकार भाई सरबजीतसिंघ निर्मले यांनी बाबा दीपसिंघजी यांच्या जीवनावर आधारित कथा केली. 

श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या सेनेत बाबा दीपसिंघजी सारखा मोठा शूरवीर योद्धा अन्याय अत्याचाराविरुद्ध असंख्य युद्धात सहभागी होता. बाबा दीपसिंघजी यांचे शौर्य आणि योगदान विसरणे अवघड असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा जन्मोत्सव साजरा करतांना समस्त मानव जातीचे कल्याण होऊन सर्वांचे आरोग्य अबाधित राहावे तसेच सर्वांच्या भावनांना न्याय मिळावा अशी प्रार्थना गुरुद्वारात करण्यात आली. नांदेड विभागीय रेलवे मंडळाचे व्यवस्थापक सरदार उपेंद्रसिंघ यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चारसाहबजादा सेवक जत्था प्रमुख स. लड्डूसिंघ काटगर, स. किरपालसिंघ हजुरीया, स. जसबीरसिंघ धूपिया, स. गुरमीतसिंघ टामाना, स. कश्मीरसिंघ भट्टी, स. लखनसिंघ लांगरी, स. राजेंद्रसिंघ सिधू, स. सुखदेवसिंघ भट्टी, स. सतपालसिंघ रामगडिया सह मोठ्या संख्येत भाविक उपस्थित होते. सर्वभाविकांसाठी लंगर प्रसाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या