💥परळी येथील लोकनेता कार्यालयात दिनदयाळ बँकेच्या नवनिर्वाचित संचलाकांचा सत्कार संपन्न...!


💥नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार भाजपा युवानेते राजेश गित्ते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात संपन्न💥

परळी ; भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दिनदयाळ बॕंकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा एक हाती सत्ता मिळवली आहे.या निवडणुकीत विजय संपादित केलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार भाजपा युवानेते राजेश गित्ते यांच्या लोकनेता संपर्क  कार्यालयात संपन्न झाला.

नवनिर्वाचित संचालक श्री राजेभाऊ दहिवाळ डॉ श्री विवेक दंडे सर,ॲड राजेश्वरराव देशमुख यांचा लोकनेता संपर्क कार्यालयात भाजपा युवानेते राजेश गित्ते यांच्या हस्ते पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी भाजपा नेते राजेश गिते, दैनिक जगमित्र संपादक बालासाहेब कडबाने, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, मांडवा भाजपा नेते कारभारी (भाऊ) मुंडे, बालाजी गुट्टे, राजेंद्र बापुराव मरळकर आदि मान्यवर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या