💥पुर्णा तालुक्यात कोरोना विषाणू ओमिक्रॉन विषाणूंचा जनसामान्यांना धोका अन् अधिकारी पुढाऱ्यांना मात्र मनमानीचा मोका...!


💥पंचायत समितीत कोरोना महामारी संदर्भातील प्रशासकीय नियमांची पायमल्ली करून 'हळद कुंकवाचा' कार्यक्रम💥


पुर्णा (दि.२१ जानेवारी) - परभणी जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरोना महामारीसह ओमिक्रॉन विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदीसह लग्न समारंभात केवळ पन्नास व्यक्ती तर अंतिम संस्कार प्रसंगी केवळ विस लोकांना अनुमती दिली असतांना व मास्क सेनिटायझरचा वापर तसेच सामाजिक अंतर ठेवण्याची सक्ती केली असतांना या प्रशासकीय नियमांची पायमल्ली प्रशासकीय अधिकारीच सोईस्कररित्या करीत असल्याचे निदर्शनास येत असून कोरोना विषाणू ओमिक्रॉन विषाणूंचा जनसामान्यांना धोका अन् अधिकारी पुढाऱ्यांना मात्र मनमानीचा मोका देत आहे की काय ? असा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना काल गुरुवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास येथील पंचायत समिती कार्यालयात घडली असून येथील पंचायत समितीच्या बिडीओ वानखेडे यांनी कोरोना महामारीसह ओमिक्रॉन विषाणूंचा संभाव्य धोका असतांना हळद-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून तालुक्यातील असंख्य आशा सेविका,अंगणवाडी शिक्षिका/सेविकांना या कार्यक्रमास निमंत्रीत केल्याने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्ह्यात लागू केलेल्या प्रशासकीय निर्देशांची अक्षरशः पायमल्ली झाल्याचे निदर्शनास आले.....   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या