💥सिरकळस येथील अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायन सोहळा व श्रीमद गागवत कथा व भजन....!


💥हभप.नंदकिसोरजी महाराज आजरसोडेकर यांचे काल्याचे किर्तन💥

ताडकळस / प्रतिनिधी

पुर्णा (दि.०८ जानेवारी) - तालुक्यातिल ताडकळस येथून जवळच असलेल्या सिरकळस येथे अंखड हरिनाम सप्ताहस गुरुवार, दि 2 जानेवारी रोजी पासुन प्रारंभ झाला. असुन  दि. 9 जानेवारी 2022 रोजी वार रविवार सप्ताह ची सांगता होत आहे. सिरकळस येथे मागील अनेकवर्षा पासून श्री संत नागाबुवा महाराज,संत मोतिराम महाराज,मारोतराव महाराज  यांच्या कुपाआशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन दर वर्षी करण्यात येते

सप्ताह कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 10 सामुहिक ग्रथराज ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन, दुपारी 12 ते 4 श्रीमद भागवतकथा, सायं. 5 ते 7 धुपारती  व रात्रौ 8.30 ते 10.30 हरि किर्तन व रात्री हरिजागर इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहत संपन्न होत आहे. सप्ताह कालवधीत भागवतकार ह.भ.प.सुर्यभान महाराज आवलगावकर यांनी भागवत कथा सांगत आहे. आज किर्तन केसरी ह.भ.प.नंदकिसोरजी महाराज आजरसोंडेकर यांचे काल्याचे किर्तनाने सप्ताहची सांगता. होणार आहे.  दरम्यान  दि. 2/1/2022 पासुन ह.भ.प. मुरलीधर महाराज दारेफकर, ह.भ.प. मधुकर महाराज सायाळकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज उकडगावकर , ह.भ.प. गंगाधर महाराज माखणीकर,  ह.भ.प. ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर, हं.भ.प.भगवान महाराज शेद्रेकर,ह.भ.प.अच्चुत महाराज दस्तापुरकर,ह.भ.प राम महाराज मिरखेलकर आदी वारकरी सांप्रदायतील प्रख्यात नामवंताच्या हरिनाम किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.9 जानेवारी 2022 रविवार रोजी गावतुन ग्रथराज ज्ञानोश्वरीची भव्य दिंडी निघणार असुन काल्यच्या किर्तनाने सप्ताहची सांगता होणार आहे. सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह.भ.प.मुरलीधर महाराज दारेफकर, ह.भ.प. सोपानकाका ताडकळसकर,गुलाब महाराज,ञ्यंबक महाराज, आदींनी केले. तर मृदंगाचार्य नवनाथ महाराज गुडेगावकर, लक्ष्मन महाराज सिरकळसकर,विठ्ठल महाराज शिरकळसकर  गायकवृंद  भानुदास महाराज , गजानन सोनेकर,सुर्यभान महाराज इसलापुरकर,गजानन महाराज भोसले,सुग्रिव महाराज बलसेकर,प्रल्हाद महाराज डुबे,नागोराव महाराज महागावकर,बबनमहाराज डुबे,बंडुमहाराज जवळेकर,रेगे महाराज,माऊली महाराज निळेकर,विठ्ठलमहाराज माखणीकर,संभाजी महाराज देशमुख, गुलाब महाराज भोसले ,ञ्यबक महाराज भोसले, ताडकळस पंचक्रोशीतील भजनी मंडळीनी साथ दिली.  गावकऱ्यांच्या वतीने दररोज भोजनाच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले. सप्ताह सांगता प्रसंगी होणाऱ्या  विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी घेण्याचे आवाहन सिरकळस ग्रामास्थाच्या वतीने करण्यात आले .असुन यशस्वीतेसाठी  सिरकळस येथिल युवक व ग्रामस्थानी परिश्रम घेत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या