💥दक्षिण मध्य रेल्वेने मराठवाड्यातील प्रत्येक जिह्यात पिटलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी...!



💥प्रवासी महासंघाने केली रेल्वे प्रशासनाकडे केली मागणी💥

परभणी (दि.20 जानेवारी) - दक्षिण मध्य रेल्वेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगण विभागात प्रत्येक जिल्ह्यात पिट लाइन सुविधा करण्यासाठी प्रयत्न होत असताना मराठवाड्यात असा प्रयन्त का होत नाही ? उलट दमरे चे अधिकारी पिटलाईन वरून या भागातील जनते मध्ये जिल्हा जिल्ह्यात भांडणे लावत असल्याचा आरोप प्रवासी महासंघाने केला आहे.      

आज दमरेच्या आंध्र-तेलंगणात हैदराबाद 7, सिकंदरबाद 6, काचिगुडा 3,  विजयवाडा 5, मचलीपट्टनम 2, गुंटूर 2, काकिनाडा 2, नरसापूर 2, काजिपेट 1, नल्लापाडु (गुंटूर जवळचा) 1, गुंतकल 1 अशा एकूण 32  पिट लाइन सुविधा असून, आणखी अनेक स्थानकावर पिट लाइन निर्माणाचा कार्य अविरत चालु आहेत. मात्र मराठवाड्यात काही लोक ज्याना रेल्वे बाबत एबिसीडी देखील माहिती नाही असे लोकं काही न काही उलटसुलट अडथळे निर्माण करण्याची प्रयन्त करत आहेत. औरंगाबाद ला पीट लाइन झाल्यास जालना ला फिट लाइन मिळणार नाही जालना येथे  झाल्यास औरंगाबाद ला मिळणार नाही असे समजतं परस्पर वादविवाद करत आहेत करायला सुरुवात करतात नेमका रेल्वे काय आहे याना काहीच माहित नसताना केवळ विरोधासाठी विरोध करतात. एखाद्या प्रकल्पावरुन जिल्हाजिल्ह्यात वाद होताच  ह्याचाच लाभ घेऊन दमरे अधिकारी कोणत्याही सुविधा देण्यास नकार देतात आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पाला मंजुर झालेली रक्कम, रेल्वे सुविधा आंध्र-तेलंगणात पळवुन तिथल्या प्रकल्पासाठी वापरतात.*

 मराठवाडा विभागातील एकाधी रेल्वे आंध्र किंवा तेलांगणात पळविल्यानंतर कोणीही तोंड देखील उघडत नाही. नुकताच नांदेड-पुणे रेल्वेला पुणे पासून हडपसर पर्यंत कमी करून नवीन रेल्वे सुरू करण्याची नाटक रचविण्यात आल्यावर देखील संपूर्ण मराठवाडा विभागातून कोणीच विरोध दर्शवला नाही मनमाड मार्गे आठवड्यातून दोनदा धावणार नांदेड येथून पुणे पर्यंत एकमेव रेल्वे असताना सदर रेल्वे ला हडपसर पर्यंत कमी करून नवीन रेल्वे सुरू केल्याचे नौटंकी करून घेतली. हडपसर येथून पुण्याला पोहचताना होणारी असुविधा पाहून सदर रेल्वे ला प्रतिसाद कमी होत चालली आहे. रेल्वे अधिकार्यांच्या ट्रावेल्स मालकांचा लाभ पोहोचण्यासाठीचा षडयंत्र पास झाला आहे. नांदेड-हडपसर रेल्वे प्रकरणामुळे माननीय मंत्री दानवे यांच्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अंधारात ठेवल्याचे दिसत आहे मंत्री महोदयांनी फक्त जालना जिल्ह्याचे रेल्वे मंत्री न वागता सर्व जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे दानवे साहेब मंत्री झाल्यापासून मराठवाडा विभागात एखादी नवीन रेल्वे घोषणा किंवा निधी मिळाला अस काही घडलेलं नाहीए  त्यामुळे किमान रेल्वे राज्यमंत्र्यांनी अधिकारी वर्गाचा मराठवाड्याप्रति असलेला दुजाभाव दूर करून  या विभागात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्रा सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे,रितेश जैन, डाॅ राजगोपाल कालानी, कादरीलाला हाशमी, रवींद्र मूथा, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी,दयानंद दीक्षित,रुस्तम कदम, वसंत लंगोटे इत्यादी ने केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या