💥श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५५ व्या जन्मोत्सवा निमित्त पवित्र धार्मिक ग्रंथांच्या पाठास सुरुवात..!

 


💥अकाल गड जत्था व हुजूरी साध संगतच्या वतीने गुरुद्वारा गेट नंबर २ येथे पवित्र धार्मिक ग्रंथांच्या पाठास सुरूवात💥

नांदेड (दि.०८ जानेवारी) - सिख धर्माचे दहावे गुरू दसमपीता साहीब श्री गुरू गोबिंदसिंघ महाराज यांच्या ३५५ व्या जन्मोत्सवा निमित्त अकाल गड जत्था व हुजूरी साध संगतच्या वतीने दि.०३ जानेवारी २०२२ पासून गुरुद्वारा गेट नंबर २ येथे धार्मिक ग्रंथाच्या पाठास सुरूवात करण्यात आली आहे.


शहरातील सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारा येथील गेट नंबर २ येथे आयोजित पवित्र धार्मिक ग्रंथ वाचनात पवित्र श्री गुरु ग्रंथ साहीब,पवित्र श्री दसम ग्रंथ साहीब,पवित्र श्री लोह ग्रंथ साहीबचे पाठ करण्यात येत असून या पाठाची समाप्ती  रविवार दि.०९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०-०० वाजता होणार आहे.
या पाठ समाप्तीस तख्त सचखंड श्री हुजुर साहीबजीचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी व समुह पंच प्यारे साहीबान,संत बाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले,संत बाबा नरींदरसिंघजी कारसेवावाले,माता साहीब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा तेजासिंघजी व समुह संत महापुरुष हजर राहणार असून यावेळी समस्त हुजुरी रागी सिंघ किर्तन करणार असून यानंतर पाठ समाप्तीची अरदास (प्रार्थना) व लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या पाठ समाप्ती व लंगर प्रसादाचा समुह साध संगत व श्रध्दाळूंनी लाभ घेऊन गुरु महाराज यांचा आशिर्वाद प्राप्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या