💥'दर्पण दिनी' मतलबी अधिकारी लोकप्रतिनिधींसह राजकारण्यांनी वर्षभर लेखणी झिजवणाऱ्या पत्रकारांना दाखवले दर्पण ?


💥पुर्णा तालुक्यातील सर्वच शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी अन् राजकारण्यांना पडला दर्पण दिनाचा विसर💥

राज्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात काल गुरुवार दि.०६ जानेवारी २०२२ रोजी 'दर्पन दिन' अर्थात 'पत्रकार दिन' शासकीय पातळीवर नव्हे खाजगी पातळीवर पत्रकारांनी साजरा केला.आद्य पत्रकार तथा मराठी पत्रकारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांनी दि.०६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाच्या पहिल्या मराठी वर्तमान पत्राची सुरूवात करून महाराष्ट्रात मराठी पत्रकारीतेची झंजावती घोडदौडीला सुरूवात करून दिली यानंतरच राज्यात अनेक वर्तमान पत्रांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली महाराष्ट्र शासनानेही ०६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन-पत्रकार दिन म्हणून घोषित केला खरा परंतु शासकीय पातळीवर मात्र 'दर्पण दिन' म्हणावे त्या पद्धतीने साजरा केला जात नाही ही शोकांतीकाच म्हणावी लागेल जनहीताशी बांधिलकी जोपासून सातत्याने वर्षभर आपली लेखणी झिजवून जनहीतवादी शासकीय योजनांसह विविध शासकीय योजनांची माहिती तसेच महामारी असो की अन्य कुठलेही संकट या संदर्भात सातत्याने जनजागृती करणाऱ्या व राजकीय पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी समाजात समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्यांना प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकारांसाठी मान-सन्मानाचा एकमेव दिवस असलेल्या दर्पण दिन - ०६ जानेवारी या दिवसाचा विसर पडावा यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती ? स्वाभिमानी पत्रकार मित्रांनो याद राखा तुम्ही ज्या लोकांसाठी सातत्याने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासह विविध समस्यांकडे दुर्लक्ष करून ज्या लोकांसाठी आपली लेखणी सातत्याने झिजवता त्या लोकांनीच 'दर्पण दिनी' तुम्हाला 'दर्पण अर्थात आरसा' दाखवण्याचे काम केले आहे.


परभणी जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल समजल्या जाणाऱ्या पुर्णा तालुक्यात जनहीतवादी पत्रकारीता करीत असतांना सत्याच्या बाजूने असत्याच्या विरोधात निर्भीडपणे वृत्तांकन करणे म्हणावे तितके सोपे नाही सर्वसामान्य जनतेच्या न्याय-हक्कासाठी आपली लेखणी झिजवणाऱ्या पत्रकारांना भ्रष्ट लोकप्रतिनिधी बेईमान राजकारणी सर्वसामान्य जनतेचे आर्थिक मानसिक सोशन करणारे भ्रष्ट अत्याचारी नौकरशाह अर्थात अधिकारी/कर्मचारी प्रस्थापित तसेच माफिया समाजकंठक गुंडाच्या द्वेषाला वेळोवेळी सामोरे जावे लागते परंतु या सर्वाच्या दावणीला बांधलेल्या बाजार बसव्यांना मात्र या बाबतीत यत्किंचितही त्रास सहन करावा लागत नाही ताटाखालची मांजर बनून भ्रष्टाचारी बेईमान प्रवृत्तींची जी..हुजुरी करणाऱ्या बाजार बसव्यांना त्यांच्याकडून यथेच्छ अर्थ सन्मान मिळतो त्यामुळे त्यांना जनहीतवादी पत्रकारीतेचा वेळोवेळी होणाऱ्या अवामानाचे काही सोयरसुतक नसते कोट्ट्यावधींची अफरातफर करणाऱ्या भ्रष्ट बेईमानांच्या मोडक्या तोडक्या इभ्रतीची ढाल बनून स्वतःचे मोठेपण करून घेणारे बाजार बसवे जनहीतवादी पत्रकारीतेचा गळा घोटण्याचे काम सोईस्कररित्या करतांना पाहून कदाचित् 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांचा आत्माही स्वर्गात अश्रू ढाळत असेल...नेमक्या याच बाजार बसव्या ताटाखालच्या मांजरींमुळे जनसामान्यांचे आर्थिक मानसिक सोशन करणारे भ्रष्टाचारी अधिकारी/कर्मचारी व कोट्ट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची अफरातफर करणारे जनमतावर निवडून येणारे भ्रष्ट बेईमान लोकप्रतिनिधी गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास येत असून शासनाने जनहितार्थ अंमलात आणलेल्या शासकीय योजनांची तसेच घटना दुर्घटनांची जनहीताशी बांधिलकी जोपासून पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांना माहिती देणे तर सोडाच हो सन्मानाची वागणूक देण्यासही तय्यार नसल्यामुळे भ्रष्ट बेईमानांना कमालीची हिंमत आल्याचे निदर्शनास येत असून या बाजार बसव्या ताटाखालच्या मांजरांच्या जी-हुजूरी पत्रकारीतेमुळे जनसामान्यांची मोठ्या प्रमाणात गळचेपी होत असून एक प्रकारे जनहीतवादी पत्रकारीतेचा गळा घोटण्याचे काम भ्रष्ट बेईमानांकडून ताटाखालची मांजर हातात धरून केले जात असल्यामुळे शासनाने घोषित केलेल्या दर्पण दिन अर्थात पत्रकार दिनाचे महत्व शुन्य ठरल्याचे दिसत आहे.

पुर्णा तालुक्यातील कोणत्याही शासकीय निमशासकीय कार्यालयात तर सोडाच राजकीय पदाधिकारी लोकप्रतिधीच्या कार्यालयातही दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन साजरा करून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांना अभिवादन व पत्रकारांना साधे एक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्याची तसदी सुध्दा दाखवू नये यापेक्षा लाजीरवानी गोष्ट कोणती ? वर्षभर अश्या बेईमान भ्रष्टाचारांना आपली लेखणी झिजवून मोठपण देणाऱ्या पत्रकारांनो या भ्रष्ट बेईमानांनी तुम्हाला एक प्रकारे दर्पण अर्थात आरसा दाखवून तुमच्या इज्जतीचे धिंडवडे उडवले असे तुम्हाला वाटत नाही काय ? अरे..आता तरी स्वतःला सावरा...रे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या