💥गंगाखेड-नांदेड रोडवरील बहुप्रतिक्षीत ऊड्डाणपूलाचे ऊद्घाटन येत्या ९ जानेवारी रोजी....!


💥राज्याचे सार्वजनीक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन💥

गंगाखेड - नांदेड रोडवरील बहुप्रतिक्षीत ऊड्डाणपूलाचे ऊद्घाटन येत्या ९ जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनीक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होत आहे. प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 

आज रविवार दि.०२ जानेवारी २०२१ रोजी बांधकाम विभागाचे उपअभियंता बालाजी पवार, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी जागेची पाहणी केली. यावेळी कनिष्ठ अभियंता आकाश पोळ, जेष्ठ व्यापारी बालाजी माणिकवार, कंत्राटदार प्रतिनिधी सलमान शेख, रोड कारकून रौफ आदी ऊपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या