💥मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळी मतदारसंघात रस्ते विकासाची गंगा...!


💥रविवारी ना.मुंडे करणार 9 महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन💥

परळी (दि.15 जानेवारी) - : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून परळी मतदारसंघात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत असून मतदारसंघातील 9 महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 15) कोविडविषयक निर्बंधांचे पालन करून व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. 

परळी मतदारसंघातील भिलेगाव ते कावळ्याची वाडी, भिलेगाव फाटा येथे सकाळी 9 वा., जयगाव ते पांढरी तांडा, जयगाव येथे सकाळी 10वा., राज्य मार्ग 211 ते बोरखेड रस्ता, बोरखेड येथे सकाळी 11 वा., राज्य मार्ग 211 ते तेलसमुख रस्ता, तेलसमुख येथे दु. 12 वा., राज्य मार्ग 16 ते कौडगाव साबळा, कौडगाव साबळा येथे दुपारी 1 वा. , राज्य मार्ग 16 ते देशमुख टाकळी, देशमुख टाकळी येथे दुपारी 2 वा., संगम ते लोणारवाडी व इजिमा 137 ते वाण टाकळी तांडा, संगम येथे दुपारी 3 वा., राज्य मार्ग 233 ते कासारवाडी रस्ता, कासारवाडी येथे दुपारी 4 वा. आणि राज्य मार्ग 211 नागदरा रस्ता, नागदरा येथे सायंकाळी 5 वा. या रस्ते विकास कामांचे भूमीपूजन ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य आमदार संजयभाऊ दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या ताई शिरसाट तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत भूमिपूजन करण्यात येत असलेल्या या सर्व कामांच्या ठिकाणी रविवार दि. 16 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून या भूमीपूजन समारंभास ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुरुवात होणार असुन, प्रातिनिधिक स्वरूपात व शासकीय निर्बंधाना अनुसरून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम संपन्न होणार असून कोणत्याही कार्यक्रमात भाषण, सभा होणार नसून केवळ भूमीपूजन कार्यक्रम व छोटेखानी संवाद होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या