💥कर्जदार सय्यद पाशा यांनी तारण ठेवलेल्या मालमत्ते पैकी ३४३ सह ५४३ देखील त्यांचीच...!


💥तक्रारदार डुकरे यांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा सोनपेठ नागरी बँकेचा आरोप💥

💥दोन्ही मालमत्तांची सीमा आणि शेजारी एकच💥

✍🏻सिध्देश्वर गिरी

सोनपेठ/प्रतिनिधी

सोनपेठ नागरी बँकेच्या कर्जवाटप आणि तक्रार यांच्यातील प्रकरणाला आता नवे वळण निर्माण झाले असून बँकेच्या वतीने पत्रक काढून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.यात बँकेची स्थिती भक्कम असून बँकेस कर्ज वसूल करण्याच्या अधिकाराने बँकेने कर्ज वसुली करण्यासाठी कार्यवाही केली आहे.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी.गौड यांनी खुलासा केला आहे की,कर्जदार सय्यद पाशा सय्यद नजमोद्दिन याने २०११ मध्ये बांधकाम करण्यासाठी मालमत्ता क्रमांक ३४३ वर कर्ज घेतले होते.

यावेळी पगारपत्रक सोबत जोडले होते.त्यानंतर २०१८ मध्ये दहा लाख रुपये कर्ज दिले असून.मालमत्ता क्रमांक ३४३ व पगारपत्रक,आणि कर्जाचे मूल्य यात ताळ बसत नसल्याने बँकेकडून पाशा यांना सूचना देऊन अजून मालमत्ता गहाणखत करण्याची सूचना बँकेने दिली होती.त्यानंतर पाशा यांनी मालमत्ता क्रमांक ५४३ चे कागदपत्रे व तपासणी रिपोर्ट आणून बँकेत जमा केल्यानंतर मालमत्ता क्रमांक ३४३ व ५४३ बँकेकडून गहाणखत करून पाशा यांना कर्ज देण्यात आले हा मुद्दा पाशा यांचा?

सदरचे प्रकरण चालू असताना शेख पाशा शेख सुलेमान याने सन २०१७ मध्ये कर्जदार सय्यद पाशाकडून मातीमोल किमतीने सदरची मालमत्ता केवळ ६५ हजारात विकत घेतली.बँकेत गहान असणारी मालमत्ता आहे.हे माहित असूनही शेख पाशा यांनी मालमत्ता विकत घेतली.जे की, बँकेने ती मालमत्ता बावीस लाख ३ हजारात लिलावात विकली आहे.त्यानंतर २०१८ मध्ये मालमत्ता क्रमांक ५४३ शेळगावमध्ये अस्तित्वात नाही.हे लक्षात आल्यानंतर बँकेने महाराष्ट्र सहकारी नियमातील तरतुदीनुसार मूळ कर्ज असणारी मालमत्ता क्रमांक ३४३ वर जप्तीची कारवाई केली यात बँक प्रशासनाचा किंवा पदाधिकारी यांचा काय दोष?

सदरचे प्रकरण माहित असूनही पुन्हा ही मालमत्ता भास्कर डुकरे यांनी केवळ ६५ हजारांमध्येच विकत घेतली.ज्या मालमत्तेची विक्री लिलावातून बावीस लाख तीन हजारात करण्यात आली.ज्यावेळी दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ ने वरील मालमत्तेचे विवरण लाखात काढले होते.जी बँकेत गहाण असते तिच मालमत्ता कमी मूल्यात खरेदी करून ही विकणाराने आणि विकत घेणाराने फसवणूक केली नाही का?

सदरच्या मालमत्तेच्या जप्तीच्या व्यवहाराबाबत वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन दिले होते.तसेच ग्रामपंचायत कार्यालय शेळगाव येथे नोटीसही डकवण्यात आली होती.पोलिसांकडे सदरच्या मालमत्तेवर कर्ज असून कर्जदाराने फसवणूक केली आहे.हे बँकेने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही २०१८ ते २०२१ पर्यंत पोलिसांनी सदरच्या मालमत्तेवर अनधिकृत ताबा करणाऱ्या सध्याच्या तक्रारदारावर कोणती कारवाई केली?मूळ कर्ज असताना दुय्यम निबंधक श्रेणी १ चा बोजा असतांना विकणारा आणि विकत घेणारा दोषी नाही का?

पोलिसांना हे कळले नसेल का?

भास्कर डुकरे याने लिलावाच्या नोटीसला दिवाणी न्यायालय सोनपेठ येथे आवाहन दिले होते.दि.०७-०८-२०२१ रोजी न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून बँकेच्या बाजूने निकाल दिलेला आहे.हे विशेष

भास्कर डुकरे यांनी नमूद केलेल्या तक्रार एफआयआर मध्ये दावा फेटाळल्यानंतर दि.१-१०-२०२० रोजी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली.असा उल्लेख केला आहे.मुळात डुकरे यांचा दाखल दावा दि.०७-०८-२०२१ रोजी फेटाळला गेला.त्यानंतर १-१०-२०२० ही तारीख आली कशी?

दाखल एफआयआरमध्ये डुकरे यांनी केलेला उल्लेख माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशाने मला तक्रार दाखल करण्याचे अधिकार दिले आहेत.असा आहे परंतु न्यायालयाने दिनांक ०९-१२-२०२१ रोजी स्पष्ट आदेश दिले होते की,याचिकाकर्ता बँक आहे.बँकेने २०१८ रोजीची तक्रार दिलेली आहे.ही तक्रार नोंदवुन त्यानुसार तपास करावा.त्यावेळी भास्कर डुकरे हे सदरील याचिकेत पक्षकार देखील नव्हते.हे विशेष

तसेच भास्कर डुकरे यांनी मालमत्ता क्रमांक ३४३ ही खरेदी केलेली असतांना व ५४३ शी कोणताही संबंध नसतांना एफआयआर हा ५४३ बाबत नोंदवला कसा?हे लक्षात येत नाही आणि पोलिसांच्याही आलेले नाही हे वैशिष्ट्ये?

भास्कर डुकरे यांनी २०२० मध्ये न्यायालय सोनपेठ येथे खाजगी तक्रार दाखल केलेली होती.कारण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याने सदरील प्रकरण प्रलंबित असताना एफआयआर नोंद त्याच प्रकरणात करणे विधिग्राह्य नसताना पहाटे ३ वाजून ५४ मिनिटांनी गुन्हा नोंद केला व सकाळी ११ वाजता डुकरे यांनी न्यायालयात चालू असणारे प्रकरण काढून घेतले हा प्रकार न्यायउचित नाही ? फक्त गहाणखतामध्ये बँकेमार्फत गहाणखत करून घेणार अध्यक्ष असा उल्लेख असल्याने बँकेच्या अध्यक्षांना विनाकारण आरोपी करण्यात आले आहे.

बँकेने सय्यद पाशा सय्यद नजमोद्दीन हा सन २००५ पासून खातेदार सभासद असल्याने त्याच्यावर विश्वास दाखवला परंतु त्याने मालमत्ता क्रमांक ३४३ हीच मालमत्ता बनावट कागदपत्रांद्वारे ५४३ भासवून बँकेचे कर्ज उचलले आहे.बँकेचा विश्वासघात केला आहे.मुळात मालमत्ता क्रमांक ५४३ च्या कागदपत्रातून असे दिसते की,मालमत्ता क्रमांक ३४३ व ५४३ यांच्या चतुरसीमा एकच आहेत.जे की शेजारी असणाऱ्यांचा उल्लेखही तोच आहे.या गंभीर बाबीकडे पोलिसांनी लक्ष देण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवला कसा बँकेकडून सवाल आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या