💥वडखेल येथे नवनिर्वाचित भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते यांचा नेत्रदीपक नागरी सत्कार...!


💥यावेळी फटाक्यांची अतिषबाजी करून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला💥


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले धडाडीचे कार्यकर्ते चंद्रकांत देवकते यांची भाजपा युवा मोर्चाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल परळी तालुक्यातील वडखेल येथे गावकऱ्यांच्या वतीने भव्य नेत्रदीपक नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील युवकांनी उत्साहाने मिरवणूक काढून महिलांनी जागोजागी औक्षण केले. तसेच फटाक्यांची अतिषबाजी करून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला. 


                परळी तालुक्यातील वडखेलचे माजी सरपंच म्हणून देवकते यांनी उत्कृष्ट काम केले आहे. भाजपमध्येही गेल्या अनेक वर्षापासून ते सक्रीय आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचा शहरी आणि ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाने जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते यांच्यावर युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नवनिर्वाचित भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते यांच्या निवडीबद्दल जन्मभूमी वडखेल येथे भव्य दिव्य नेत्रदीपक नागरी सत्कार करण्यात आला. दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य शाल व श्रीफळ तसेच फेटा बांधून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी वडखेल व पंचक्रोशीतील पुरूष, महिला, युवक व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरून उपस्थितीतांना संवाद साधला व जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, भाजपा राज्यकार्यकारणी सदस्य श्रीहरी मुंडे, किसान मोर्चा प्रदेश सदस्य उत्तम माने, भाजपाचे नेते श्रीराम मुंडे, तालुका सरचिटणीस रवि कांदे सर, युवा नेते प्रा.अजय गित्ते यांनी आपले विचार व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्काराला उत्तर देतांना नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देवकते म्हणाले की,  पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असुन त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे ते म्हणाले. तसेच व्यासपीठावरील भारतीय जनता पक्षाच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानुन सर्वाचे आशीर्वादामुळे मला या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. गावकऱ्यांचे प्रेम पाहुन उपस्थिती पाहून मी भावनिक झालो असून इतर ठिकाणांच्या सत्कारापेक्षा   माझ्या मातृभूमीतील जन्मभूमीतील हा सत्कार सोहळा मी आयुष्यभर विसरणार नाही. म्हणून हा सोहळा इतर सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे.वेळात वेळ काढून आपण मोठ्या प्रमाणात माझ्या सत्कार प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. गावकऱ्यांनी ऐवढे प्रेम दिले कि कधीही विसरू शकत नाही असे उदगार चंद्रकांत देवकते यांनी केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे जेष्ठ नेते दिलीपराव बिडगर, भाजपा माजी तालुकाध्यक्ष जीवराज ढाकणे,  माजी  उपसभापती बाबासाहेब काळे,  तालुका उपाध्यक्ष विनायक गडदे, तालुका सरचिटणीस सुरेश माने,  तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे, माजी सभापती बळीराम गडदे, भिवासाहेब बिडगर, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, तालुका उपाध्यक्ष किशोर गीते, गोविंद सोनवणे, तानाजी वावळे, सरपंच माऊली साबळे, सरपंच पिंटू कोपनर, तालुका सचिव शिवराज मुंडे, सरपंच कृष्णा सलगर, सरपंच बाळासाहेब शिंदे, प्रताप दादा देशमुख, माजी सरपंच भीमराव हाके, युवा नेते गणेश होळंबे, उपसरपंच रामेश्वर कदम, युवा नेते संभाजी सातभाई, वाल्मीक नाना सातभाई, जय जीत शिंदे, रामेश्वर शिंदे, बंडू लांडगे, अनिस भाई शेख , रमेश पोळ यशवंत कराड, नारायण कोळेकर, गोविंद मोहेकर, श्रीनिवास राऊत तसेच परचुंडी, मलनाथपुर, वाघाळा, भिलेगाव, पिंपळगाव, कोडगाव, घोडा कोडगाव, साबळा ,कानडी, सेलू, रेवली, तडोळी व पंचक्रोशीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक माऊली महाराज यांनी केले तर सुत्रसंचालन पांचाळ सर  व आभार पवनकुमार यांनी मानले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या