💥परभणीत दर्पण दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन...!


💥या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याहस्ते होणार आहे💥

परभणी, (दि.०५ जानेवारी)- परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व सुर्या हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमीत्त गुरुवार, 6 जानेवारी रोजी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याहस्ते होणार आहे. गेल्या पाच वर्षापासून सूर्या हॉस्पीटलच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ व पहिले दर्पण हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले. या दिवसाची आठवण म्हणून दर्पण दिन साजरा करण्यात येतो. परभणीतील सूर्या हॉस्पीटलमध्ये होणार्‍या या आरोग्य तपासणी शिबीरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, डॉ.संजय खिल्लारे, डॉ.अमिताभ कडतन, डॉ.प्रविण संगवे, डॉ.संदीप काला, डॉ.शहेबाज देशमुख, डॉ.अशोक बन, डॉ.सुनिल चिलगर आदी तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत. यानंतर दर्पण दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबीरास मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, मार्गदर्शक डॉ.आसाराम लोमटे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज कदम, कार्याध्यक्ष राजकुमार हट्टेकर, प्रदेश प्रतिनिधी प्रभू दिपके, लक्ष्मण मानोलीकर, प्रविण देशपांडे, माणिक रासवे, धाराजी भुसारे, मोहन धारासूरकर, प्रविण चौधरी, शेख इफ्तेखार आदींची प्रमुख उपस्थ्लिृती राहणार आहे. या आरोग्य तपासणी शिबीराचा पत्रकारांनी सकाळी 7 ते 11 या वेळेत लाभ घेण्याचे आवाहन आबासाहेब कड, सुभाष कच्छवे, बालासाहेब काळे, शिवशंकर सोनुने, विठ्ठल वडकूते, शेख मुबारक, संजय भराडे, मोईन खान, अक्षय मुंडे, नरहरी चौधरी, दिलीप बनकर, दिनकर देशपांडे, संघपाल अढागळे, राजू करडिले, नजीर खान, विशाल माने, सुधाकर श्रीखंडे, पांडूरंग अंभोरे, मंदार कुलकर्णी, उत्तम बोरसुरीकर, सय्यद अखील, शेख महेबुब, बालाजी कांबळे, अमर गालफाडे, रियाज कुरेशी, सय्यद खिजर, शैलेश डहाळे, संजय घनसावंत, सुनिल सुतारे, दिपक साळवे आदींनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या