💥परभणी तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पावरील कालवा व मायनरच्या रखडलेल्या कामांना सुरुवात...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश ; जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांचे सर्वत्र होत आहे कौतुक💥 


परभणी - निम्न दुधना प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या परभणी तालुक्यातील डावा मुख्य कालवा व मायनरची अर्धवट व इतर रखडलेल्या कामांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे काल दि. ०३.०१.२०२२ रोजी पहिल्या टप्प्यातील मांगणगाव व मटकराळा येथील कामांना सुरुवात करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्यातील कामाना २-३ दिवसात सुरुवात होईल. तीन टप्प्यात होणाऱ्या या कामात गाळ काढणे, दुरुस्ती करणे , कालव्या लगतचे रस्ते बनवणे त्या शिवाय पांदण रस्ता व गाव रस्त्यासाठी कालव्यावर पुल टाकणे तसेच अर्धवट राहिलेले मायनर व शेतचाऱ्याच्या रखडलेल्या कामांचा समावेश आहे.


निम्न दुधना प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या परभणी तालुक्यातील  साडेगाव, सावंगी खुर्द, मटकराळा व मांगणगाव येथील शेतकर्यांनी उजव्या कालव्यावरील अर्धवट, रखडलेल्या व मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्गी लावून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे व इतर मागण्यासाठी दि. २४.१२.२०२१ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी स्वरुपात मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत त्याच दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्ष पदाधिकारी व तक्रारदार शेतकर्यांसह माजलगाव कालवा क्र. १० ( निम्न दुधना प्रकल्पा अंतर्गत ) चे कार्यकारी अभियंता श्री. प्रसाद लांब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते व १५ दिवसाच्या आत संबंधीत कामे सुरू न झाल्यास कार्यालया विरोध जनआंदोलन करून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनाची तत्काळ दखल घेत कार्यकारी अभियंता यांनी दि. ३१.१२.२०२१ रोजी प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी व तक्रारदार शेतकरी यांच्यासह कालव्याची जायमोक्यावर जाऊन पाहणी केली.

काल दि.०३.०१.२०२२ रोजी जलसंपदा विभागा मार्फत मशनरी लावून या कामांना सुरुवात करण्यात आली यात कालव्यावरील गाळ काढणे, कालव्या लगतचा रस्ता बनवणे, मायनर व शेतचाऱ्या तयार करणे या कामाला मांगणगाव व मटकराळा सीमेवर असणाऱ्या क्र. ४ च्या कालव्यावर सुरुवात  करण्यात आली यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व रखडलेल्या कामांना सुरुवात करून दिल्याबद्दल या परिसरातील शेतकर्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत. जलसंपदा विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या या कामांची पाहणी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली यांच्या सोबत निम्न दुधना प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता श्री स्वामी, युवाआघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर पुंजारे, मिडिया प्रभारी नकुल होगे, परिसरातील शेतकरी किशनराव गरुड, भानुदासराव गरुड, भागवत गरुड, पांडुरंग गरुड व इतर शेतकरी उपस्थितीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या