💥पर्यावरण अधिनियमान्वये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आठ इसमांवर कारवाई....!


💥वाशिम पोलिस दलाची कारवाई💥

वाशिम:-मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्यापासुन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या करीता जिल्हयात वेळोवेळी नाकाबंदी/कोम्बींगचे आयोजन करुन अवैद्य धंदयावर कारवाई,मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा चालु ठेवला आहे मकरसंक्रांती सणा निमित्त ठिकठिकाणी पंतग उडविण्याची प्रथा आहे.

 त्याकरीता वापरण्यात येणारा नायलॉन मांजामुळे पक्षी तसेच बाईक स्वार यांना हानी पोचल्याच बऱ्याच घटना वेगवेगळया जिल्हयात घडल्याने अशाप्रकारच्या अपघात होवु नये याकरीता मा.मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी नायलॉन मांजा बंदीचे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शहरात विशेष पथक स्थापन करण्याचा आदेश दिल्याने मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांचे आदेशान्वये पोनि स्थागुशा जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेची तिन पथके तयार करुन नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमाविरुध्द कारवाईचे आदेश दिले.दिनांक १२.०१.२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यालयात हजर असतांना गुप्त बातमीदारांकडुन फोनद्वारे खात्रीलायक बातमी मिळाली की, बागवानपुरा वाशिम येथे १) मोहमंद अब्दुल्लाह मोहमंद हाफीज वय २१ वर्ष रा. बागवानपुरा वाशिम, २) मोहमंद अब्दुल्लाह मोहमंद हाफीज वय २१ वर्ष रा.बागवानपुरा वाशिम ३) गोपाल अशोक अढाळ वय २७ वर्षे रा जुनी नगर परिषद वाशिम यांच्या दुकानाची झडती घेतील असता एकुण १७ बंडल, २ मांजा गुंडाळण्याचे मशीन ३०००/- आणि मांजा ४२००/- असा मुददेमाल मिळुन आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच पोलीस स्टेशन स्तरावर सुध्दा केसेस करण्यात आल्या असुन पोस्टे मंगरूळपिर हददीत रमेश नारायणराव पलाई रा मंगरूळपीर याचे कडुन नायलॉन मांजाचा २,८०० रू चा मुददेमाल पोस्टे कारंजा शहर येथे नरेश रमेशलाल जयसिंघानी रा सिंधी कॉलनी कारंजा यांचेकडुन नायलॉन मांजाचा मुददेमाल कि अ २०० रूपये,रमेशलाल पंजुमल जयसिंघानी रा सिंधी कॉलनी कारंजा यांचेकडुन नायलॉन मांजाचा ८०रू चा मुददेमाल, किशोर महादेव माहुलकर वय ४० वर्ष रा टिळकचौक कारंजा यांचेकडुन नायलॉन मांजाचा मुददेमाल कि अ ८०० रू मुददेमाल, विवेक शांतीकुमार कानेड रा बायपास चौक कारंजा याचेकडुन नायलॉन मांजाचा मुददेमाल कि अ ४०० रू असा एकुण १०,४८० रूपयाचा मुददेमाल मिळुन आला असुन वरील ८ इसमांचे हे कृत्य कलम ५ पर्यावरण अधिनियम १९८६ अन्वये गुन्हा होत असल्याने त्यांना वेळीच ताब्यात घेवुन कलम ५ पर्यावरण

अधिनियम १९८६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नमुद कारवाईत मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरिक्षक जाधव स्थानिक गुन्हे शाखा, पोनि आधारसिंग सोनुने, पोउपनि कोथलकर वाचक उपविपोअ मंगरूळपिर, पो.ह किशोर चिंचोळकर, सुनिल पवार,गजानन अवघळे, पोना अमोल इंगोले, प्रविण राऊत, शुभम चौधरी, गजानन जाधव यांनी सहभाग नोंदविला.मा. पोलीस अधिक्षक यांनी आपले सण उत्सव साजरे करताना अथवा पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर टाळुन पर्यावरणाचे सरंक्षण करणे करीता तसेच, मुक्या पक्ष्यांचे जिवितास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही व मनुष्यहानी/तसेच कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही अशा साध्या पध्दतीने कोरानाचे नियमाचे अधिन राहुन सण उत्सव साजरा करणे बाबत जनतेला आवाहन केले. अशा प्रतिबंधीत नायलॉन मांजाची कोणी विक्री करतांना इसम आढळल्यास त्वरित नियंत्रण कक्ष वाशिम येथे कळविणे बाबत सुध्दा आवाहन करण्यात आले आहे....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या