💥लहान मुलांच्या आधार कार्डबाबतच्या नियमांत बदल,आधार प्रमाणीकरणाला वेग..!


💥यूआयडीएआय'ने मुलांच्या आधार कार्डबाबतच्या नियमात केले काही बदल💥

✍️ मोहन चौकेकर 

धारकार्ड.. प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे दस्ताऐवज.. कोणतेही सरकारी काम असो, आधारकार्डची गरज पडतेच.. अगदी नवजात बाळापासून प्रत्येकाचे आधारकार्ड तयार केले जाते. ओळखपत्र म्हणून त्याचा सर्वाधिक वापर होत असल्याचे दिसते.

'युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया' (UIDAI)द्वारे प्रत्येकाचे आधारकार्ड जारी करण्यात येते. 'यूआयडीएआय'ने मुलांच्या आधार कार्डबाबतच्या नियमात काही बदल केले आहेत.

*काय बदल झालेत..?

▪️ बाळाचा जन्म झालेल्या रुग्णालयाचे प्रमाणपत्र किंवा स्लिप देऊन पालक आपल्या मुलाच्या आधारकार्डसाठी अर्ज करू शकतात.

▪️ 'यूआयडीएआय'च्या नियमानुसार, 5 वर्षांखालील मुले बालआधारसाठी पात्र आहेत. आता 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी 'बायोमेट्रिक्स' आवश्यक नाही.

▪️ मूल 5 वर्षांचे झाल्यावर त्याचे 'बायोमेट्रिक' आवश्यक असेल. त्यानंतर, मुख्य आधारकार्डप्रमाणेच बालकांचे आधार कार्ड जारी केले जाईल.

*आधारकार्डसाठी अटी :-

▪️ अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक.

▪️ नोंदणीच्या वेळी वय 5 वर्षांपेक्षा कमी असावे.

▪️ मुलाचे जन्म प्रमाणपत्र, शिवाय पत्त्याचा पुरावा असावा.

▪️ पालकांचा आधारकार्ड क्रमांक हवा.

▪️ मुलाचा पासपोर्ट फोटो, पालकांचा फोन नंबर आवश्यक.

*आधार प्रमाणीकरणाला वेग :-

दररोज 50 लाखांहून अधिक आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ऑफलाइन प्रमाणीकरणाची संख्या 5 कोटींहून अधिक आहे. 'यूआयडीएआय'ने नुकतीच आधार प्रमाणीकरणाची किंमत 20 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी केली असल्याची माहिती 'यूआयडीएआय'चे 'सीईओ' सौरभ गर्ग यांनी दिली

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या