💥परभणी महानगर पालिका पथकाची ११२ नागरिकांवर दंडात्मक कारवाई...!


💥विना मास्क फिरल्याचे आढळले प्रभाग समिती अ,ब,क अंतर्गत मोहीम💥 

परभणी : शहर महापालिकेच्या वतीने ५ जानेवारी रोजी शहरातील विविध भागांमध्ये कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण ११२ नागरिकांवर मनपा व पोलिस पथकाकडून कारवाई करण्यात आली. 

शहरातील आपणा कॉर्नर  येथे प्रभाग समिती अ अंतर्गत तीस जणांवर कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती ब अंतर्गत जाम नाका येथे १७ व प्रभाग समिती क अंतर्गत काळीकमान, वसमत रोड येथे ३९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली तसेच पोलिसांनी आनलाईन २६ जणांवर  कारवाई केली. एकूण ११२ नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम महापालिकेच्या पथकासह शहरातील नवा मोंढा, कोतवाली आणि नानलपेठ पोलिस ठाणे  यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. नागरिकांनी विना मास्क फिरू नये यासाठी या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच आरटीपीसीआर तपासणीसाठी जाम नाका, गंगाखेड नाका, विसावा फाटा, शिवाजी चौक, सिटी क्लब, काळीकमान, गांधी पार्क येथे ही तपासणी केली जात आहे. मनपाचे सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, भगवान यादव, मुख्यजीत खान, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मेहराज आहमद, विकास रत्नपारखे, अब्दुल शादाब, न्यायरत्न घुगे, लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकळे, प्रकाश काकडे, किरण बनसोडे, राजू झोडपे, श्रीकांत कु-हा यांचा सहभाग आहे. शहरातील नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे जाणवल्यास आपली चाचणी करून घ्यावी तसेच विना मास्क फिरणे व कोरोणा नियमांचे पालन सामाजिक अंतर राखून करावे, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी नागरिकांना केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या