💥पुर्णा शहरातील मुख्यंरस्त्यांसह नागरी वसाहती सुध्दा घांणीच्या विळख्यात परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात....!


💥शहरात चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यात कापल्या जाणाऱ्या  जनावरांचे रक्तमिश्रीत पाणी रस्त्यांवर ; पंख वेस्टेज परिसरात💥

पुर्णा (दि.०३ जानेवारी) :- शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध नागरी वसाहतींमध्ये बेकायदेशीर चालणाऱ्या मांस विक्रीच्या दुकानांमध्ये कापल्या जाणाऱ्या कोंबड्या-बकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या गाई-बैलांच्या मांस विक्रीच्या दुकानांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले असून या अवैध मास विक्रीच्या दुकानांवर नगर परिषद प्रशासनासह स्वच्छता विभागाचे हेतुपुरस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीक त्रस्त झाल्याचे दिसत आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की शहरातील स्वामी दयानंद चौक लोकमान्य टिळक रोड,कुंभार गल्ली,भिम नगर,कुरेशी मोहल्ला आशोक रोड,आण्णाभाऊ साठे नगर कोळीवाडा कुंभार गल्ली विजय नगर पंचशील नगर हारिनगर सिध्दार्थ व आंबेडकर नगर सह ग्रामीण भागातील कानंखेड खुंजडा निळा फुकटगाव आश्या १५ ते १६ गावातील सर्व लाहान मोठे महीला पुरुष नागंरीकांसह शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थीनींना शहरात येण्यासाठी कुरेशी मोहल्ला ते महर्षी दयानंद टी पॉईन्ट रोड आसलेला एकमेव मुख्य रस्ता आसुन या रस्तांवर अवैद्यरीत्या चिकन मटन तसेच गाई-बैलाच्या मास विक्रीची दुकान लाउन बसलेले दुंकानदार रक्त मिश्रीत पाणी कोंबड्यांची पंख आतडी कातडी जनावंराच्या पोटातील निघालेली घाण वेस्टेज मांस मुख्य रस्तांवर तसेच दुंकाना मांगे आसलेल्या रेल्वे कपॉउंड मध्ये टाकत असल्यामुळे याची दुर्गंधी परिसरातील नागरी वसाहतींमध्ये पसरत असल्यामुळे परिसरात थांबने तर दुरच येथुन जातांनाही दुर्गंधीमुळे स्वास बंद पडून चंक्कर येऊन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातील स्वामी दयानंद सरस्वती चौक परिसरात असंख्य बेकायदेशीर चिकन-मटन व जनावरांच्या मटनाची दुकाने अक्षरशः उघड्यावर लावण्यात आल्याने या परिसरातून रस्त्याने चालने सुध्दा अवघड झाले आहे परंतु या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासनाची जाणीवपूर्वक आर्थिक हितसंबंध जोपासून डोळेझाक होत असून परिसरातील नागरिक अक्षरशः नर्क यातना सहन करीत आहे याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे परिसरातील मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये मद्य खरेदी करणौयास येणारे मद्य ग्राहक आपली वाहन रस्त्यावरच उभी करत असल्यामुळे रहदारीला प्रचंड अर्थळे निर्माण होत असून त्यामुळे वादही निर्माण होतांना दिसत असून मद्याचा साठा घेऊन आलेली मद्य कंपन्यांची चार चाकी वाहन दोन ते तिन तास रस्त्यावर उभी केली जात असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहणानंसह नागरीकांना त्रास सहन करावा लागतो त्यात कधी रुग्ण वयोवृद्ध तर गर्भवती महीला असतात अशांनाही येथुन वावरतांना कसरत करावी लागते.

रेल्वे कंपॉउडं मध्ये इंतकी घाण होऊणही या सर्व प्रकाराकडे रेल्वे प्रशांसनाच दुर्लक्ष तर होत आहेच त्याही पेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे नगर परिषद प्रशांसनचाही या अवैध चिकन मटनांच्या दुकानासह रस्ताच्या झालेल्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे लक्षणीय बांब म्हंणजे पुर्णा नगरपरिषदेच्या स्वंच्छता निरिक्षकांसह व नगर परिषदेतील ५०% नगर सेवकांना ही शहरांसह नगरपरिषदेत येण्यासाठी ह्याचं रस्ताचा वापर करावा लागतो तरीही याकडे कोणाही बघायल तयार नाही या संदर्भात नागरिकांकडून अनेक वेळा तक्रारी दिल्यानंतर ही नगर परिषद प्रशासन कागदी गांधी प्रेमात मग्न होऊन गांधीचे तिन बंदराची भुमिका पार पाडीत आहेत या परिसरातून वावरतांना नागरीकांना आपला जिव व आरोग्य धोक्यांत टाकुण वावरावे लागते या कडे नगर परिषद व रेल्वे प्रशांसनाने लक्ष देऊन या वर योग्य ते निर्बंध घालावे अंन्यथा या प्रकारांची पुर्णा नगर परिषदेचे मुख्यांधिकांरी परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकांरी आंचल गोयल,विभागीय रेल्वे अधिकारी नांदेड यांना लेखी तक्रांर देण्यांत येणार आसल्याची माहीती शे.रफिक शे.सत्तार मंनीयार यांच्यासंह काही नागरिकांनी दीली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या