💥पुर्णेतील माता रमाई घरकुल आवास योजने करीता निधी उपलब्ध....!


💥रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांच्या प्रयत्नांसह पाठपुराव्यांना अखेर यश💥

पुर्णा (दि.११ जानेवारी) - पुर्णा नगर परिषदे अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या माता रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यां करीता मागील एक-दीड वर्षापासून निधी उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या घरांची काम अर्धवट राहिल्यामुळे योजनेतील अनेक गोरगरीब लाभार्थ्यांवर अर्धवट बांधकामामुळे  अक्षरशः उघड्यावर राहण्याची तर काहींना भाडे तत्वावर घर घेऊन राहण्याची वेळ आली होती अश्या असंख्य लाभार्थ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत होता काही लाभार्थी तर पत्राचे शेड मारून राहत असल्याचे निदर्शनास येत होते.


शहरातील माता रमाई घरकूल योजनेतील गोरगरीब रोजमजूरा लाभार्थ्यांची झालेली दुर्दैवी अवस्था परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांच्या निदर्शनात आल्यामुळे त्यांनी त्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन निवेदनाचा पाठपुरावा केल्यामुळे माता रमाई घरकुल आवास योजने करिता प्रशासनाने २५ लक्ष रुपयांचा पूर्णा नगर परिषदेला निधी उपलब्ध करून दिला असून या माता रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांनी तात्काळ पूर्णा नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या