💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाचे अपडेट / बातम्या / हेडलाईन...!


💥लैंगिक अत्याचार केलेल्या मुलीशी विवाह,आरोपीवरील बलात्काराचा गुन्हा हायकोर्टाकडून रद्द💥

✍️ मोहन चौकेकर 

 शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत महत्त्वाची बैठक; अनिल परब,एसटी युनियनचाही समावेश; एसटीच्या सर्व मुद्यांवर चर्चा ,ॲड  सदावर्तेंना केसमधुन हटविले

 *आजपासून देशात बूस्टर डोसला सुरुवात;* फ्रंटलाईन वर्कर्स आणि सहव्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस मिळणार, विनानोंदणी लसीकरणासाठी जाण्याची मुभा

*घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर!* जुलैमध्ये मुंबईतील 4 हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी, 22 लाखांत मिळणार वन बीएचके फ्लॅट 

 *मराठवाड्यासह विदर्भात पुढील दोन दिवस यलो अलर्ट*, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता तर मुंबईत पारा घसरला

 *अवकाळी पाऊस त्यानंतर पडणारे धुके आणि ढगाळ वातावरण याचा कांद्याला फटका;* बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव, बळीराजा चिंतेत

 *राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच;* रविवारी  44 हजार 388 रुग्णांची नोंद,  एकाच दिवसात ओमायक्रॉन 207 नव्या रुग्णांची नोंद

*सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ जन्मस्थळासमोर बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा,* अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

*लैंगिक अत्याचार केलेल्या मुलीशी विवाह,आरोपीवरील बलात्काराचा गुन्हा हायकोर्टाकडून रद्द

*“योगी आदित्यनाथ यांनी मुझफ्फरनगर येथून स्वबळावर निवडणूक लढवावी” ; राकेश टिकैत यांचे आव्हान!

*कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना आता वाहनांना फी नाही;* केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

*“कर्मचारी कामावर आल्यावर कारवाई नाही”;* कृती समितीसोबतच्या बैठकीनंतर अनिल परब यांचा मोठा निर्णय

 *700 मेट्रिक टन ऑक्सिजन गरज लागल्यास राज्यात लॉकडाऊन* लागणार- मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे 

 *राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत*, टेस्टिंग वाढवणार - राजेश टोपे

 *नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या कारची ऊसाच्या ट्रॉलीला धडक, भीषण अपघातात 2 पोलिसांचा मृत्यू

*प्र. कुलपती नेमण्याची पद्धत केंद्राची,भाजपचा विरोध मला नसून नरेंद्र मोदींना - उदय सामंत  

 *महादेव जानकर यांना कोरोनाची लागण,संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्याचे आवाहन

*Sensex 650 तर Nifty 190 अंकांनी वधारला;* ऑटो, आयटी, बँकांच्या शेअर्समध्ये वाढ

 *“निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती या सरकारमध्ये नाहीय, त्यामुळे…”;* गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

 *भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण;* स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली 

*म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांना आणखी चार वर्षांचा तुरुंगवास;* कोर्टाने दोन खटल्यांमध्ये सुनावली शिक्षा 

*IND vs SA : विराटचं कमबॅक, तर ‘हा’ खेळाडू अनफिट; पत्रकार परिषदेत म्हणाला; ‘‘मला कोणालाही…”* विराट दुसऱ्या कसोटीत खेळला नाही. आता उद्या ११ जानेवारीपासून दोन्ही संघात निर्णायक कसोटी खेळवली जाणार आहे.

*वर्ल्डकप स्पर्धेतून अफगाणिस्तान संघ होणार बाद..!

*IPL 2022 : श्रेयस अय्यरचा पत्ता कट..! ‘हा’ मुंबईकर क्रिकेटर होणार नव्या अहमदाबाद संघाचा कॅप्टन!*

यासोबतच सनरायझर्स हैदराबादचा दिग्गज खेळाडूही अहमदाबाद संघात जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या