💥गंगाखेड पोलिस स्थानकाच्या कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर यांची बदली रद्द करा...!


💥गंगाखेड येथील नागरिकांनी बदली रद्द करण्यासाठी तहसिलकार्यालया समोर केली धरणे आंदोलनाला सुरुवात💥

गंगाखेड (दि.०५ जानेवारी) - गंगाखेड पोलिस स्थानकाच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची बदली नुकतीच झाली असून सदरील बदली तात्काळ रद्द करावी याकरिता गंगाखेड वासीयांनी यल्गार पुकारला आहे.

गंगाखेड पोलिस स्थानकाच्या कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक श्रीमती वसुंधरा बोरगावकर यांची बदली तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जागरूक नागरीक आघाडीच्या वतीने आज बुधवार दि.०५ जानेवारी रोजी येथील तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी भाकपचे तालुका सचिव ओंकार पवार,काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जनशक्तीचे सदस्य प्रमोद मस्के,भाजपा नेते सुरेश बंडगर, माजी सरपंच गोविंद लटपटे, योगेश फड, गोपीनाथ भोसले, केशव जायभाये, अविनाश जगतकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या