💥पुर्णा तालुक्यातील कौडगाव येथे समृद्धी महामार्ग मोजणी शेतकऱ्यांनी केली बंद.....!


💥संतप्त शेतकऱ्यांचा तिव्र विरोध होताच अखेर अधिकाऱ्यांनी पाय काढता केला💥

पुर्णा (दि.१६ जानेवारी) - प्रस्तावित जालना नांदेड महामार्गाला लागणाऱ्या आवश्यक जमिनीच्या मोजणीसाठी गेलेल्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कौडगाव येथील व पूर्णा तालुक्यातील शेतकर्‍यांनी विरोध करून मोजणी बंद केली अखेर पथकाला जमिनीची मोजणी न करता काढता पाय घ्यावा लागला जालना नांदेड प्रस्तावित द्रुतगती महामार्ग साठी जमिनीचे भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे एकंदरीतच शासन शेतकऱ्यांना गोलमाल करीत आहे यावेळी कौडगाव येथे तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा 2013 नुसार मोबदला आणि पुनर्वसन करावे जमिनी पूर्णपणे बागायती असून त्यानुसार नोंदी कराव्यात नंतर भविष्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी बाजूने सर्व्हिस रोड द्यावेत जमिनीची मूल्यांकन रेडीरेकनर दर वाढवून द्यावा आणि बाधित कुटुंबातील तरुण-तरुणींना शासकीय सेवेत अधिकारी म्हणून नियुक्ती करावी सदर महामार्गा मध्ये जमिनीचे तुकडे पडून २० आर पेक्षा जास्त तुकडे पडल्यास त्याची भूसंपादन प्रक्रिया करून योग्य मोबदला द्यावा अन्यथा आम्ही पूर्णा तालुक्यातील सर्व शेतकरी प्राणांतिक उपोषण करणार अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी मोजणी बंद केली आणि यानंतर पूर्णा तालुक्यात कुठेही भूसंपादन प्रक्रिया करू देणार नाही अशी भूमिका जाहीर केली यावेळी पूर्णा तालुका शेतकरी संघर्ष समितीचे गोविंद घाटोळ संदेश देसाई योगेश सवराते  पुंडलिक जोगदंड कृष्णा बोबडे जगन्नाथ ठेंगे शिवाजी बोबडे आदीसह तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या