💥वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम...!


💥नांदेड येथून सायंकाळी ६ वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे झाले आगमन💥

फुलचंद भगत

वाशिम (दि.२५ जानेवारी) :- गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

         आज २५ जानेवारी रोजी नांदेड येथून दुपारी २ वाजता मोटारीने वाशिमकडे प्रयाण. सायंकाळी ६ वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.२६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलिस कवायत मैदान येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी ९.४५ ते ११ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ च्या खर्चाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणा प्रमुखांची बैठक, जलसंधारण कामांचा आढावा, जलजीवन मिशन, पाणी टंचाई व जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीला उपस्थित राहून आढावा घेतील. सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेतून पत्रकार बांधवांशी संवाद साधतील. 

          सकाळी ११.३० ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत जुनी आययुडीपी कॉलनी वाशीम येथे शिव विद्यामंदिर अभ्यासिकेचे लोकार्पण करतील.कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथे  बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलाचे लोकार्पण व स्व. पुंडलिकराव गवळी व्यापारी संकुलाचे लोकार्पण करतील. दुपारी १२.२० ते १२.५० वाजतापर्यंत जिल्हा पोलिस मुख्यालय येथे विविध उपक्रमांसाठी राखीव.दुपारी १ ते १.४५ वाजतापर्यंत शासकीय विश्रामगृह  येथे अभ्यागत/  पदाधिकारी यांचे भेटीसाठी राखीव.दुपारी १.४५ ते २.१५ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव.  दुपारी २.२० वाजता शासकीय विश्रामगृह येथून सुपखेलाकडे प्रयाण,२.३० वाजता सुपखेला येथे आगमन व जलसंधारण तलावाचे भूमीपूजन करतील.दुपारी २.४० वाजता सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेला सदिच्छा भेट.दुपारी २.५५ वाजता मंगरुळपीरकडे प्रयाण.दुपारी ३.१५ वाजता मंगरुळपीर येथील जय महाराष्ट्र चौक येथे आगमन व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत गरजू नागरिक व महिलांना ब्लँकेट वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहून सोयीनुसार नागपूरकडे   मोटारीने प्रयाण करतील....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या