💥पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील राशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी...!


💥वाघाळा ग्राम पंचायतची ठरावाव्दारे तहसिलदारांकडे मागणी💥

प्रतिनिधी

पाथरी :- तालुक्याती वाघाळा येथील स्वस्तधान्य दुकानदार राशनकार्ड धारकांना कार्डाला आधार लिंक करण्या साठी तीनशे रुपये प्रती लाभधाक वसुल करत असून सातशे वर कार्डधारकां कडून आधार लिंक साठी तीनशे रूपये वसुली केली असून या शिवाय या दुकानदाराची सतत मनमानी सुरू असून संबंधिताचा राशन परवाना रद्द करून तो ग्रा पं ला जोडावा असा वाघाळा ग्रा पं ने मासिक सभेत ठराव घेऊन पाथरी तहसिलदारांना दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करावा या साठी सरपंच भागवत उर्फ बंटी पाटील यांनी शुक्रवारी १४ जानेवारी रोजी निवेदना व्दारे केली आहे.

या वेळी सरपंच बंटी पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाघाळा येथील स्वतस्त धान्य दुकानदार माणिक सुभाषराव घुंबरे यांनी मागील दोन दिवसांपासून गावातील सातशे एक शिधापत्रीका धारकांना आधार अपडेट करण्याकरीता कागदपत्रा साठी रुपयेतिनशे रुपये अवैधपणे मागीतले असून यातून मोठा अधीक गैरव्यवहार करण्यात आला आहे. गावांतील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत हे सर्व चालू आहे. आम्ही आपल्या कार्यालयातील पुरवठा विभागात या विषयी चौकशी केली असता अशा प्रकारे पैसे घेवून आधार अपडेट चालु नसुन ते ३१ जानेवारी पर्यंत मोफत असल्याचे सांगण्यात आले आहे.

या शिवाय  सदरील स्वस्त धान्य दुकानदार हे लाभार्थ्यांना त्रास देत आहे. त्यात सदरील राशन दुकानामध्ये वाटपा संदर्भात अभिलेख पुस्तके दिसून येत नाहीत शिवाय दर्शनी भावफलके दिसून येत नाही तसेच प्रत्येक वेळी गहू व तांदुळ वाटप केले जात असून इतर धान्य वाटप करण्यात येत नाही. कोराेना संसर्ग काळा मध्ये शेतकऱ्यांना व इतर लाभाथ्यांना मोफत वाटप करण्यात येणाऱ्या धान्यात अनियमीतता ठेथून सुरळीत धान्ना वाटप करण्यात आले नाही. बहुतांशी शेतकरी व इतर लाभार्थी या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे,धान्य खरेदी केल्याच्या नंतर पावती दिली जात नाही,उपलब्ध आणि शिल्लक धान्य साठया संदर्भात दर्शनी भागात कोठेही माहिती दिली जात नाही शिवाय स्वत धान्य नियमीत वाटप न करता राशन संपले असे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या प्रकरणी योग्य चौकशी करून सदरील राशन दुकानदाराचा परवाना रद्द करून कार्यवाही करावी ही ग्रामस्थांच्या वतीने मी मागणी करत असल्याचे निवेदन सरपंच बंटी पाटील यांनी पाथरी तहसिलदारांना दिले आहे.या वेळी त्याच्या सोबत भागवत बालासाहेब घुंबरे,प्रल्हाद परमेश्वर घुंबरे यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या