💥जिरेवाडी येथे श्रीमद देवीभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता...!


💥माणिकभाऊ फड यांच्या वतीने महाकाली मंदिर बांधकामासाठी 51000 रुपयांची देणगी💥

परळी (दि.१८ जानेवारी) - जिरेवाडी येथे परंपरेने सुरू असलेला श्रीमद देवीभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आज मोठ्या उत्सवा मध्ये व थाटामाटात सम्पन्न झाला आहे.

यावेळी ह.भ.प.भागवताचार्य प्रतिभाताई महाराज गित्ते यांच्या वाणीतून भाविकांनी भागवत कथा श्रवणाचा आनंद घेतला, हा उत्सव 9 दिवस मोठ्या उत्साहात चालला आज कथेच्या सांगता दिवशी ह.भ.प भरत महाराज जोगी यांचे हरी कीर्तन झाले या कार्यक्रमाला जिरेवाडी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त आवर्जून उपस्थित होते,


कार्यक्रमाला क्र.उ.बा.स.चे संचालक माणिकभाऊ फड यांनी उपस्थिती लावत महाकाली मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी 51000 /- रुपयांची देणगी दिली या वेळी गावकरी आणि भावीकभक्त यांनी त्यांचे आभार मानले व त्यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बाळासाहेब देवकर, बाप्पाजी मुंडे, जगन्नाथ महाराज गिरी, शंभूदेव मुंडे,राम मुंडे, भालचंद्र महाराज मुंडे,श्रीमंत महाराज, आश्रोबा शहाणे तसेच जिरेवाड़ी व पंचक्रोसितिल इतर भाविक भक्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या