💥वक्तृत्व हे जडणघडणीतील प्रभावी कौशल्ये - गोपाळराव भुसारे


💥संभाजी ब्रिगेडच्या या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे भुसारे यांनी यावे कौतुक केले💥

पूर्णा (दि.२६ जानेवारी) - दिनांक 26 जानेवारी, आदर्श काॅलनी येथील मराठा सेवा संघ कार्यालय येथे संभाजी ब्रिगेडच्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी बक्षिस पात्र विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना शिवश्री गोपाळराव भुसारे म्हणाले की, 'प्रभावी वक्तृत्वाने आपल्याला माणसांची मने जिंकता येतात. वक्तृत्व हे जडणघडणीतील प्रभावी कौशल्येआहे. वक्तृत्वाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. वक्तृत्व ही प्रत्येक क्षेत्रात पुढे नेणारी मोठी आणि प्रभावी कला आहे. याच कलेने अनेक माणसे मोठी झाली. म्हणून ग्रामीण विद्यार्थ्यांनी वक्तृत्व ही कला आत्मसात करावी असे प्रतिपादन करून संभाजी ब्रिगेडच्या या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले.

मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड पूर्णा तालुका द्वारा राजमाता जिजाऊ जयंती निमित्त स्त्रियांची स्थिती काल, आज आणि उद्या' व 'आदर्श माता राजमाता जिजाऊ' या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक तवर हे होते. गोपाळराव भुसारे हे प्रमुख मार्गदर्शक होते. तर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद आंबोरे, तालुका सचिव विठ्ठल शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव साहेब शिंदे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गंगाधर कदम, करण शिंदे, राज जोगदंड भरत बोबडे राजू शिंदे, स्वप्नील कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

        या वक्तृत्व स्पर्धेत, कु. तेजस्विनी तुकाराम बुचाले या विद्यार्थ्यीनीने प्रथम क्रमांक पटकावला. कु. दुर्गा परसराम बोबडे हिने द्वितीय, अथर्व दीपकराव मुंबरकर तृतीय बक्षिस मिळवून यश संपादन केले. तर महारुद्र नारायण हरणे व कु. वैभवी विष्णुकांत भालेराव यांनी प्रोत्साहनपर बक्षीस मिळवून यश संपादन केले. प्रथम बक्षीस संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री बालाजी मोहिते, द्वितीय बक्षीस मराठा सेवा संघाचे शिवश्री बालाजी पोपळे, तृतीय बक्षीस संभाजी ब्रिगेड पूर्णा तालुक्याच्या वतीने देण्यात आले. तर प्राचार्य अशोक तवर व मराठा सेवा संघाचे तालुका सचिव शिवश्री विठ्ठल शिंदे यांच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. प्रथम 2000/-, द्वितीय 1500/-, तृतीय 1000/- व प्रोत्साहनपर प्रत्येकी 500/- व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

     प्राचार्य अशोक तवर यांनी अध्यक्षीय मनोगतातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन साहेब शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाधर कदम, करण शिंदे, राज जोगदंड, भरत बोबडे राजू शिंदे, स्वप्नील कदम, बालाजी हिलाल, व्यंकटी ढोणे, कंटीराम बोबडे, महेश कदम व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या