💥राज्यात तुर्तास लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध लावले जाणार लवकरच जाहीर होणार नवीन नियमावली...!


💥बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते💥

 ✍️ मोहन चौकेकर

संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बैठकीकडे लागलं होतं, ती मंत्रालयातील बैठक नुकतीच संपली आहे. सध्या तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही. मात्र निर्बंध आणखी कडक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. 

आज उशीरा रात्री नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला जाणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री कोणत्या निर्बंधांना हिरवा कंदील दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. 

▪️आज रात्रीपर्यंत कडक निर्बंधाची नियमावली जाहीर होणार आहे, अशी माहिती आहे. आज बैठकीत जी चर्चा झाली त्याची माहिती मुख्यमंत्री यांना दिल्यानंतर मुख्यमंत्री आज निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे.  

▪️टास्क फोर्स सोबत राज्यातील कोरेनाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.  उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देऊ नका. त्याचप्रमाणे निधीला कात्री लावू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाला आजच्या बैठकीत दिल्या आहेत...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या