💥पुर्णा न.पा.निवडणूकीत धर्माच्या नावावर सत्ता मिळवणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी केला तिन समाजाचा विश्वासघात....!

 



💥सोनार समाज मंदिरासाठी सर्वसाधारण सभेत ठराव पास केल्यानंतर ही अद्याप जागा उपलब्ध नाही💥

💥अण्णाबाभाऊ साठे समाज मंदिराचे नुतनीकरण करण्याचे खोटे आश्वासन देऊन मातंग समाजाचा केला विश्वासघात💥


💥संत शिरोमनी रोहिदास महाराज समाज मंदिराचे आश्वासन ही ठरले फोल चांभार समाजाचा ही केला विश्वासघात💥

पुर्णा ; पुर्णा नगर परिषदेच्या सन २०१६ यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत हिंदुत्ववादाच्या नावावर निवडणूक लढवून नगर परिषदेत सत्ता प्राप्त केलेल्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी आपल्या पाच वर्षाच्या कालावधीत सोईस्कररित्या तिन समाजाचा अक्षरशः विश्वासघात करण्याचे पाप केल्याचे निदर्शनास येत असून या बेगडी हिंदुत्ववाद्यांचे बेगडी हिदुत्ववादाची पोल खुलल्याचे निदर्शनास येत असून दि.०४ ऑगस्ट २०१६ यावर्षी पुर्णा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ०५/०७ अंतर्गत सोनार समाजाचे समाज मंदिर व सांस्कृतिक सभागृहासाठी जुन्या कोर्ट इमारतीत नगर परिषद वाचनालयाच्या मागील नगर परिषदेची मोकळी उर्वरीत जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमाप करून देण्याचा ठराव एकमताने पास करण्यात आला खरा परंतु सदरील जागा सोनार समाज अद्याप पर्यंत देण्यात आलेली नाही.


सन २०१६ यावर्षी नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत जनमतातून नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या गंगाबाई एकलारे व त्यांचे प्रतिनिधी संतोष एकलारे यांच्याकडून सोनार समाजाला समाज मंदिर व सांस्कृतिक सभागृहासाठी सर्वसाधारण सभेत ठराव पास करून मंजूर करण्यात आलेल्या या जागेवर सुसज्ज असे समाजमंदिर बांधकाम करून देण्यात येईल अशी अपेक्षा करण्यात आली होती परंतु त्यांनी समाजमंदिराचे बांधकाम तर सोडाच ही जागा सुध्दा सोनार समाजाला देण्याचे टाळल्यामुळे त्यांचे बेगडी हिंदुत्व उघड झाल्याचे निदर्शनास येत आहे.

नगर परिषदेत हिंदुत्वाच्या नावावर सत्ता हस्तगत करणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी सोनार समाजा प्रमाणेच मातंग समाजाचा सुध्दा विश्वासघात केल्याचे निदर्शनास येत असून शहराच्या विकासाच्या नावावर दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्ट्यावधी रुपयांचा विकासनिधी आवश्यकता नसलेल्या ठिकाणी अर्धवट व बोगस कामे करून विल्हेवाट लावणाऱ्यांनी मात्र जाणीवपूर्वक जिर्ण अवस्थेतील मोडकळीस आलेल्या साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे समाज मंदिराकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत असून या समाज मंदिराचे नुतनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आण्णाभाऊ साठे नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राम रुपचंद जोनवाल व रवी बाबूराव गायकवाड यांना दि.२० आक्टोंबर २०२१ रोजी नगर परिषद प्रशासनाने लेखी स्वरुपात आश्वासन देऊन मोडकळीस आलेल्या आण्णाभाऊ साठे समाज मंदिराचे जुने बांधकाम पाडून नव्याने समाज मंदिर उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १५ दिवसात नाहरकत घेण्यातयेईल असे खोटे आश्वासन देण्यात आले खरे परंतु अद्यापही या आश्वासनाची पुर्तता झालेली नाही.

संबंधित सोनार तसेच मातंग समाजा प्रमाणेच चांभार समाजाला ही संत शिरोमनी रोहिदास महाराज सांस्कृतिक सभागृह बांधण्याचे देण्यात आलेले आश्वासन अक्षरशः लबाडाचे औतान ठरल्याचे निदर्शनास येत असून धर्माच्या नावावर निवडणूक लढवून सत्ता हस्तगत करणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी जातीयवादाचे प्रत्यय देत संबंधित समाजांचा विश्वासघात केल्याचे उघड झाले असून अश्या विश्वासघातक्यांना येत्या नगर परिषद निवडणूकीत मतदार जनता त्यांची जागा निश्चितच दाखवणार यात तिळमात्र शंका नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या